ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीद्वारे ग्रहांची हालचाल आणि राजयोग सहज ओळखता येतात. पण, शरीराच्या रचनेच्या आधारे भविष्य जाणून घेण्याच्या या शास्त्राला सामुद्रिक शास्त्र असं म्हणतात हे फार कमी लोकांना माहीत आहे. समुद्रशास्त्रानुसार, पायाच्या काही रेषा पैशाच्या लाभाविषयी सांगतात. यासोबतच पायावर बनलेले काही विशेष चिन्ह धन आणि संपत्तीमध्ये लाभ दर्शवतात आणि असे लोक खूप श्रीमंत असतात. जाणून घ्या कोणकोणत्या पायांच्या खुणा माणसाला श्रीमंत बनवतात.

मोठे व्यापारी व्हा
ज्या लोकांच्या पायात अंकुश, कुंडल किंवा चक्राचे चिन्ह असतात, ते चांगले शासक, मोठे व्यापारी, अधिकारी किंवा राजकारणी बनतात. अशा लोकांना चल आणि अचल संपत्ती मिळण्याचीही शक्यता असते.

धन-संपत्तीचा मालक असतो
समुद्रशास्त्रानुसार पायांच्या मध्यापासून मधल्या बोटापर्यंत एखादी रेषा गेली तर माणसाच्या आयुष्यात खूप आनंद मिळतो. याशिवाय धन आणि संपत्तीचे सुखही मिळते. यासोबतच मुलांकडून धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. तसेच अशा व्यक्तीला राजसुख मिळतो.

पायावर शंख, चक्र आणि माशाचे चिन्ह असल्यास
सामुद्रिक शास्त्रानुसार पायात शंख, चक्र, मासाची खूण शुभ असते. जर एखाद्या व्यक्तीच्या पायावर हे शुभ चिन्ह असतील तर त्याला संपत्तीचा लाभ होतो. तसेच, अशी व्यक्ती एक व्यापारी बनते आणि अफाट संपत्तीचा मालक बनतो.

आणखी वाचा : January Rashifal 2022: नोकरी, पैसा, आरोग्य आणि व्यवसाय या सर्वच बाबतीत जानेवारी महिना या ४ राशींसाठी खास राहील

पायांवर या विशेष खुणा असतील तर…
समुद्र शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या पायावर चक्र, माला आणि अंकुश या चिन्ह असतात, त्याला राजसुख प्राप्त होतो. तसंच पायावर सूर्य, चंद्र, नक्षत्र, पृथ्वी, चामर इत्यादी चिन्ह असल्यास व्यक्ती भाग्यवान असते. तसंच त्याच्या जीवनात धन-संपत्तीची कमतरता नसते. अशा लोकांचा व्यवसाय परदेशात पसरतो.

आणखी वाचा : Sun Transit 2022 : सूर्य मकर राशीत प्रवेश करणार, या ३ राशींना सरकारी नोकरी मिळू शकते

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पायाचे तळवे असे असतील तर…
जर एखाद्या व्यक्तीच्या पायाचा तळवा मऊ असेल तर त्याला नशिबाची साथ मिळते. यासोबतच अशा लोकांना जीवनात सर्व सुख-सुविधा मिळत राहतात. याशिवाय पायाच्या तर्जनीमध्ये उभी रेषा असेल तर विवाह लवकर होतो. लग्नानंतर तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून खूप प्रेम मिळते. तसेच लग्नानंतरही नशीब असते.