after 30 years shani dev is going to enter in aquarius the luck of these zodiac signs will shine prp 93 | Shani Transit 2022 : ३० वर्षांनंतर शनीचा होणार कुंभ राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांचं नशीब उजळणार | Loksatta

Shani Transit 2022 : ३० वर्षांनंतर शनीचा होणार कुंभ राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

बहुतेक लोक याला वाईट परिणाम देणारा ग्रह मानतात. पण ज्योतिषशास्त्रानुसार हे अजिबात खरं नाही. कारण शनी कोणत्या व्यक्तीवर कधी प्रभाव पाडेल, हे जन्मपत्रिकेतील शनीच्या स्थानावर अवलंबून असतं. जाणून घ्या सविस्तर…

Shani Transit 2022 : ३० वर्षांनंतर शनीचा होणार कुंभ राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

Shani Enters In Kumbh Rashi 2022: शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे २.५ वर्षे लागतात. बहुतेक लोक याला वाईट परिणाम देणारा ग्रह मानतात. पण ज्योतिषशास्त्रानुसार हे अजिबात खरं नाही. कारण शनी कोणत्या व्यक्तीवर कधी प्रभाव पाडेल, हे जन्मपत्रिकेतील शनीच्या स्थानावर अवलंबून असतं. जर शनी एखाद्या शुभ ठिकाणी बसला असेल तर शनीची दशा देखील शुभ प्रभाव देते. जर शनी ग्रह पत्रिकेत अशुभ ठिकाणी असाल तर तुम्हाला जीवनात अडचणींचाही सामना करावा लागेल. २०२२ मध्ये शनी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, जाणून घ्या या ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा काय परिणाम होईल.

३० वर्षांनंतर शनी कुंभ राशीत प्रवेश करेल: २९ एप्रिल २०२२ रोजी शनी कुंभ राशीत प्रवेश करेल. शनीचे हे राशीपरिवर्तन जवळपास ३० वर्षांनी होणार आहे. शनी हा देखील या राशीचा अधिपती ग्रह आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांवर त्यांची विशेष कृपा असते. याशिवाय शनी मकर राशीचा स्वामी आहे. मिथुन ही त्यांची श्रेष्ठ राशी आहे आणि मेष ही त्यांची दुर्बल राशी आहे.

आणखी वाचा : Chanakya Niti : अशा लोकांपासून नेहमी सावध राहा, तुमच्या विनाशाचे कारण बनू शकतात

कुंभ राशीतील शनीचे संक्रमण यांना लाभ देईल: मेष, वृषभ, धनु आणि तूळ राशीच्या लोकांसाठी शनीचे राशी परिवर्तन शुभ सिद्ध होईल. तुमचे उत्पन्न वाढेल. पैशाशी संबंधित समस्या सुटण्याची शक्यता आहे. अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. आई-वडील आणि जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रत्येक गोष्टीत नशीब तुमची साथ देईल. नवीन योजनांमधून तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात.

आणखी वाचा : Love Horoscope 2022 (Vrishabh Rashi): वृषभ राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनात आनंद राहील, जोडीदाराची साथ मिळेल

या राशींवर शनीची साडे सती आणि धैय्या राहील : शनीचा कुंभ राशीत प्रवेश होताच कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडे सातीचं दुसरं चरण सुरू होईल. दुसरीकडे, मकर राशीच्या लोकांसाठी त्याचा शेवटचा टप्पा आणि त्याचा पहिला टप्पा मीन राशीपासून सुरू होईल. शनी धैय्याबद्दल बोलायचं झालं तर मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना शनी कुंभ राशीत प्रवेश करताच शनी धैय्यापासून मुक्ती मिळेल. त्याच वेळी कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीची धैय्या सुरु होईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-12-2021 at 20:18 IST
Next Story
१८ वर्षांनंतर राहू मेष राशीत करेल प्रवेश , ‘या’ ४ राशीच्या लोकांच्या जीवनात आणेल आनंद आणि समृद्धी