नवी दिल्ली : ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था’ म्हणजेच ‘एम्स’मधील संशोधकांनी आपण श्वास सोडत असलेल्या संयुगांपासून रोग ओळखण्यासाठी ‘ब्रेथ प्रिंट उपकरण तयार केले आहे. ‘ई-नोझ’ नावाच्या या उपकरणामुळे फुप्फुसाच्या कर्करोगाचे निदान होण्यास मदत होऊ शकते, असे या संशोधकांकडून सांगण्यात आले. या उपकरणात फुंकणे आवश्यक आहे. ब्रीथलायझरसारखे हे उपकरण असून फुंकर मारल्याने तुम्हाला फुप्फुसाचा कर्करोग आहे की नाही हे सांगता येईल. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये काही भागांत आरोग्य सुविधा विलंबाने पोहोचतात, तिथे फुप्फुसाचा कर्करोग लवकर शोधण्यास मदत होऊ शकते, असे एम्सच्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन ब्रेथ रिसर्चचे प्रमुख डॉ. अनंत मोहन यांनी सांगितले. आपण सोडत असलेल्या श्वासातील अस्थिर सेंद्रिय संयुगामुळे साधारणत: फुप्फुसाचा कर्करोग होतो. या उपकरणामुळे हा आजार ओळखण्यास मदत होईल, असे मोहन यांनी सांगितले.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत