Alum Cleaning Hacks: अनेकदा घराच्या साफसफाईसाठी लोक बाजारातील महागड्या वस्तू खरेदी करतात, आणतात. परंतु, आपल्या सर्वांच्या घरात एक गोष्ट अशी आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही कमी खर्चात तुमचे घर सहज स्वच्छ करू शकता.

तुरटीने घर कसे स्वच्छ करावे?

तुम्ही तुरटीच्या मदतीने तुमचे घर सहज आणि कमी वेळेत उजळवू शकता. वास्तविक, तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरियलसह इतर अनेक गुणधर्म असतात, ज्याच्या मदतीने तुम्ही घर सहज स्वच्छ करू शकता.

साहित्य

  • तुरटीची पावडर किंवा तुरटीचा चुरा
  • अर्धी बादली पाणी
  • कपडा

टाइल्समधील घाण तुरटीने सहज साफ करता येते. याच्या मदतीने जमिनीवरची घाण किंवा डाग सहज साफ होतील. यासाठी आधी बादलीत पाणी, त्यात तुरटीचा तुकडा किंवा पावडर टाकून पाच मिनिटे तसेेच राहू द्या.

हेही वाचा: घरात डासांचा सुळसुळाट वाढतोय? केळीच्या सालीचा ‘हा’ सोपा उपाय डासांचा करेल नायनाट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा प्रकारे घर स्वच्छ करा

आता फरशी स्वच्छ करण्यासाठी कपड्याच्या मदतीने जमिनीवर पाणी पसरवा. आता थोडा वेळ फरशी सुकू द्या. यामुळे जमिनीवर असलेले बॅक्टेरिया आणि बुरशी सहज निघून जातील. आता जमिनीवर पसरलेले पाणी कोरड्या कपड्याने पुसून घ्या. तुरटी बॅक्टेरिया आणि बुरशी नष्ट करते, यामुळे हट्टी डाग आणि घाण सहजपणे काढून टाकते.