Home Remedy for Gas and Bloating: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण चविष्ट पदार्थांच्या मागे इतके धावत आहोत की, पोटाची काळजी घ्यायलाच विसरत आहोत. वेळ व प्रमाण न पाहता, मनाला जे वाटेल ते खाल्लं जातं आणि त्याचीच परिणती पोटाचे विविध आजार सुरू होण्यात होते. अपचन, गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता व पोट फुगणे या समस्या तर जणू दैनंदिन आयुष्याचा भाग झाल्या आहेत.
मात्र, पोटाचे हे सगळे त्रास संपवणारा एकच उपाय आहे आणि आपल्या संस्कृतीत शेकडो वर्षांपासून त्याचा वापर केला जात आहे. जेवणानंतर केवळ हे एक पान चावले, तर पोट हलके वाटू शकते. पोटफुगी गायब होऊ शकतं आणि पचनक्रिया दुरुस्त होऊ शकते, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
आपण रोज खाण्यात केलेल्या छोट्या चुका आपले पोट हळूहळू बिघडवत असतात; पण पोट साफ न झाल्यास मूड, झोप, भूक व त्वचा या सगळ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. आता कल्पना करा की, जेवण झाल्यावर फक्त एक हिरवे पान चावले आणि अपचन, गॅस, सूज, आम्लपित्त सगळ्या तक्रारी काही क्षणांत गायब होतील. हा उपाय इतका सोपा असूनही, फार कमी लोकांना तो माहीत आहे. जाणून घ्या हे गुपित उपायाचं पान कोणतं…
हे कोणते पान आहे?
भारतीय परंपरेत जेवणानंतर पान खाण्याची जुनी पद्धत आहे. अनेक ठिकाणी ते सुपारी, काथ, चुना व गुलकंदासह खाल्ले जाते. पण, खरी ताकद दडली आहे ती विड्याच्या पानात. एम्सचे माजी कन्सल्टंट व साओल हार्ट सेंटरचे फाउंडर व डायरेक्टर डॉ. बिमल झाजर यांच्या मते, जेवणानंतर खाण्याचे पान चावल्यास पचनाशी संबंधित जवळपास सगळ्या समस्या दूर होतात.
पचन सुधारण्यात पान कसे मदत करते?
पान चावल्यावर लाळेचे उत्पादन वाढते आणि लगेचच पाचन एन्झाइम्स सक्रिय होतात. त्यामुळे खाल्लेले अन्न पटकन पचू लागते. त्यामुळे –
- गॅस व ब्लोटिंगवर नियंत्रण मिळतं.
- आम्लपित्त आणि जळजळ कमी होते.
- आतड्यांची हालचाल सुरळीत होते आणि बद्धकोष्ठता दूर होते.
- टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात
डॉ. झाजर सांगतात की, ज्यांना सतत अपचन, भूक न लागणं किंवा पोट फुगण्याची तक्रार असते, त्यांनी जेवणानंतर खाण्याचे पान चावण्याची सवय लावल्यास फरक लगेच जाणवतो.
खाण्याच्या पानाचे इतर गुप्त फायदे
फक्त पचनच नाही, तर खाण्याच्या पानात अजून अनेक गुण आहेत. हे पान नसांमधील कडकपणा कमी करतं, विचारशक्ती वाढवतं, जीवाणू नष्ट करतं, सूज कमी करतं आणि त्वचेचे आरोग्य सुधारते. आश्चर्य म्हणजे यात अँटी-कॅन्सर गुणधर्मदेखील आहेत. एवढंच नव्हे तर पान खाल्ल्याने मूड फ्रेश होतो आणि डिप्रेशनपासूनही आराम मिळतो.
तर, पुढच्या वेळी जेवण झालं की विसरू नका… हे एक पान तुमच्या आरोग्याचा मोठा तारणहार ठरू शकते.