How to Get Rid of Yellow Teeth: आजकाल पिवळ्या दातांची समस्या सामान्य आहे. खाण्याच्या सवयी बिघडल्यामुळे बहुतेक लोकांचे दात पिवळे दिसू लागतात. हे पिवळे दात सौंदर्यावरही परिणाम करतात. अशावेळी दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी आज बाजारात अनेक प्रकारची रासायनिक उत्पादने उपलब्ध आहेत. परंतु, त्यांचा वापर कधीकधी खूप हानिकारक ठरतो. त्यात असलेली रसायने केवळ दातांचे नुकसान करू शकतात. त्यामुळे तुमच्या स्वयंपाकघरातीलच काही वस्तूंच्या मदतीने दात पांढरे करू शकता.
‘या’ दोन प्रभावी उपायांनी दातांचा पिवळेपणा होईल दूर
मोहरीचे तेल आणि मीठ
दातांचा पिवळटपणा दूर करण्यासाठी तुम्ही मोहरीचे तेल आणि मीठ वापरू शकता. दात पांढरे करण्यासाठी हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. यासाठी चिमूटभर मीठ घ्या आणि त्यात मोहरीच्या तेलाचे काही थेंब घाला. आता ते बोटाच्या मदतीने दातांवर दोन-तीन मिनिटे घासून घ्या. काही वेळाने तुम्ही चूळ भरू शकता. तुम्ही ते आठवड्यातून दोन-तीन वेळा करू शकता.
मीठ आणि लिंबाचा रस
तुम्ही मीठ आणि लिंबाच्या रसानेही तुमचे दात सहज स्वच्छ करू शकता. खरंतर, लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असते, जे दातांवरील डाग सहज काढून टाकण्यास मदत करते. ते स्क्रबरप्रमाणे काम करते. तुम्ही ते सहजपणे वापरू शकता. यासाठी चिमूटभर मिठात लिंबाच्या रसाचे काही थेंब घालून त्याचे मिश्रण हलक्या हातांनी दातांवर घासा. तुम्ही ते आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरू शकता.