Diabetics Cure: गुरमार किंवा जिमनेमा सिल्वेस्ट्रे ही एक उष्णकटिबंधीय वनस्पती आहे जी भारतातील मध्य, पश्चिम आणि दक्षिणेकडील उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये वाढते. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि चीनच्या उष्णकटिबंधीय भागात सुद्धा ही औषधी वनस्पती वाढते. आयुर्वेदिक गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे, गुरमार मधुमेह, मलेरिया आणि अगदी साप चावणे आणि पचन समस्या यासारख्या विविध आजारांवर उपचार करण्यासाठी फायदेशीर असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. फ्लेव्होनॉइड्स, सिनामिक ऍसिड, फॉलिक ऍसिड आणि ऍस्कॉर्बिक ऍसिडच्या उपस्थितीमुळे, गुरमारच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते.

जर्नल ऑफ हर्ब्स, स्पाइसेस अँड मेडिसिनल प्लांट्समध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की गुरमार या शब्दाचे भाषांतर ‘साखर नष्ट करणारा’ आहे. ही पाने जिमनेमिक ऍसिड, जिम्नेमासाइड्स, ऍन्थ्राक्विनोन, फ्लेव्होन, हेन्ट्रियाकोनटेन, पेंटाट्रियाकोनटेन, फायटिन, रेस यांसारख्या अनेक सक्रिय संयुगांनी समृद्ध आहे. ऍसिड, फॉर्मिक ऍसिड, ब्युटीरिक ऍसिड, ल्युपॉल आणि अल्कलॉइड जसे की जिमनामाइन, यामुळे ते अँटी डायबेटिक गुणधर्मांनी समृद्ध होते.

WebMD च्या माहितीनुसार, “Gymnema मध्ये असे पदार्थ असतात जे आतड्यात साखरेचे शोषण कमी करतात. जिमनेमामुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढू शकते आणि स्वादुपिंडातील पेशींची वाढ होऊ शकते, यामुळे शरीरात इन्सुलिन तयार होते.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने गुरमारच्या पानांचे एक चमचे चूर्ण पाण्यात टाकल्यास शरीरात कर्बोदके शोषून घेण्यास मदत होते. या औषधी वनस्पतीमधील जिम्नेमिक ऍसिड तुमच्या जिभेवरील साखरेचे रिसेप्टर्स अवरोधित करतात, ज्यामुळे गोडपणाची चव घेण्याची तुमची क्षमता कमी होते. यामुळे साखरेची लालसा कमी होऊ शकते.

हे ही वाचा<< आठ तास लॅपटॉपसमोर असताना चेहऱ्यावर सनस्क्रीन लावली असेल तर काय होईल? तज्ज्ञांचं उत्तर वाचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ही औषधी वनस्पती वजन कमी करण्यात मदत करण्यासाठी देखील ओळखली जाते. संशोधनात समोर आलेल्या माहितीनुसार, १२ आठवडे पानांचे सेवन केल्याने जास्त वजन असलेल्या लोकांना शरीराचे वजन आणि बॉडी मास इंडेक्स कमी होण्यास मदत झाल्याचे आढळून आले आहे. अलीकडे अनेक आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात सुद्धा तुम्हाला ही पाने सहज उपलब्ध होऊ शकतात, तरीही सेवन करण्याआधी एकदा तुमच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेणे उचित ठरेल