Healthy Tips: दिवसाची सुरुवात ज्या प्रकारे होते त्यामुळे आरोग्यावर मोठ्याप्रमाणात परिणाम होत असतो. तुम्ही कसे बसता, उठल्यानंतर काय करता, उठल्यानंतर काय पित आहात आणि उठल्यानंतर काय खात आहात या सर्व गोष्टींचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होत असतो. कित्येकदा आपण नकळपणे अश्या गोष्टी करतो ज्यामुळे आपले आरोग्य बिघडते. जाणून घ्या, असे कोणत्या सवयी आहेत ज्यांच्यापासून सुटका मिळवणे अत्यंत आवश्यक आहे आणि कोणते काम आहे जे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करते.
सकाळी उठल्यानंतर हे काम केल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो
नाश्ता न करणे
सकाळचा नाश्ता हा दिवसातील अत्यंत महत्त्वाचा आहार आहे. जर सकाळी नाश्ता केला नाही तर दिवसाची सुरुवात करण्यासाठी आवश्यक उर्जा मिळत नाही ज्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये व्यक्ती गरजेपेक्षा जास्त खातो. त्यामुळे सकाळी नाश्ता करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सकाळचा नाश्ता संतुलित असला पाहिजे.
हेही वाचा – गप्प बसा! दिवसभरात फक्त १ तास शांत राहा, कोणाशीच काही बोलू नका; सुधारू शकते तुमचे मानसिक आरोग्य
सकाळी उठल्यानंतर फोन वापरणे
फोनवर रिल्स स्कॉल करत राहणे किंवा सोशल मीडिया फिड पाहत राहणे हे एक मोठे कारण आहे ज्यामुळे तुम्ही रात्री वेळेत झोपत नाही. पण सकाळी उठताच जर फोन वापत असाल तर तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमचे मानसिक आरोग्यावर खूप परिणाम होतो आणि तुमची काम करण्याची उर्जा आणि क्षमता कमी होऊ शकते. सोशल मीडियावर काही वाईट अथाव चुकीचे काही पाहिले, ऐकले की मूड खराब होतो आणि ताजेतवाने झाल्यासारखे वाटत नाही.
सकाळी उठल्या उठल्या कामाला सुरुवात करणे
आयुष्यात खूप काम खूप महत्त्वाचे आहे आणि कामाला प्राधान्य देणे आवश्यक आहे पण सकाळी उठल्या उठल्या काम करण्याऐवजी स्वत:साठी थोडा वेळ काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या वेळात स्ट्रेचिंग केले पाहिजे. व्यायाम केला पाहिजे आणि काही वेळ लेखन करू शकता किंवा वाचन करू शकता त्यामुळे मानसिकरित्या तुम्ही स्वस्थ राहू शकता.
हेही वाचा – तुमच्या जोडीदाराला खूप राग येतो का? रिलेशनशिप एक्सपर्टने सांगितले रागवणारा जोडीदार असण्याचे फायदे
आरोग्यदायी नाश्ता न करणे
सकाळी सकाळी नाश्त्याला छोटे भटुरे- पुरी भाजी खाऊ दिवसाची सुरुवात करणे हे ऐकायला चांगले वाटते पण असा नाश्ता पचण्यास जड असतो. त्यामुळे प्रयत्न केला पाहिजे की आहारात भरपूर फायबक असले पाहिजे यासाठी प्रयत्न करा. जसे की उपमा, पोहा, इडली, ओट्स किंवा बेसन पोळी खाऊ शकता.
हेही वाचा – आईने लेकाला कधीही ऐकवू नयेत ‘या’ गोष्टी; मुलांच्या मनाला लागू शकतात तुमचे शब्द
घाई घाईमध्ये काम करणे
सकाळची सुरुवात शांतपण केली पाहिजे. मन शांत असेल तर दिवस चांगला जातो. तेच सकाळी सकाळी जर घाई घाई केली तर सर्व गोष्टींची टेन्शन घेऊन तुम्ही आजारी पडू शकता.