नवी दिल्ली : बहुसंख्य स्त्रियांना कधी ना कधी संप्रेरकांच्या असंतुलनामुळे (हार्मोनल इम्बॅलन्स) होणाऱ्या त्रासाला समोरे जावे लागते. या असंतुलनामागे ताणतणाव, बैठी जीवनशैली, मधुमेह, अयोग्य आहार अशी अनेक कारणे आहेत. मात्र, या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास स्त्री बीजाशय बिघाड (पीसीओडी), थॉयरॉइडच्या समस्या किंवा वंध्यत्वासारखे विकार होऊ शकतात. चिंता, नैराश्य, पौष्टिक आहाराचा अभाव, प्रजननक्षमतेच्या समस्यांनीही हे असंतुलन होऊ शकते. पुढील लक्षणे वारंवार दिसल्यास तातडीन वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार घ्यावेत, योग्य व्यायाम व पथ्ये पाळावीत, असा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आहे.

संप्रेरक असंतुलनाची लक्षणे कोणती

peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
stomach disorders, stomach disorders pollution
Health Special: प्रदूषणामुळे होणारे पोटाचे विकार कोणते?
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

१) लहरी स्वभाव : एका क्षणी आनंदी असताना दुसऱ्याच क्षणी क्रोध येत असेल, चिंताक्रांत होत असाल तर हे संप्रेरक असंतुलनाचे  हे लक्षण असू शकते.

२) अशक्तपणा : नीट झोप झाल्यानंतरही सकाळी उठल्यापासून सतत अशक्तपणा जाणवत असेल, तर ते संप्रेरक असंतुलनाचे लक्षण असण्याची शक्यता आहे.

३) केस गळती : केस चांगल्या स्वरूपात असतानाही अचानक गळू लागले तर ही समस्या असू शकते.

४) अचानक वजन वाढणे : वजन वाढणे हे संप्रेरक असंतुलनाचे मुख्यत्वे दिसणारे लक्षण आहे.

तुम्ही नियमित व्यायाम, पौष्टिक आहार, योग्य प्रमाणात निद्रा घेत असाल व तरीही वजन वाढत असेल, तर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या

५) त्वचाविकार : मुरुम, चेहरा आणि त्वचेवरील डाग, रुक्ष-कोरडी त्वचा किंवा खूप प्रमाणात तेलकट त्वचा हेही या असंतुलनाचे लक्षण आहे.

६) अनियमित पाळी : अनियमित मासिक पाळी आणि त्या वेळी वेदना होत असतील, तर हे असंतुलनाचे लक्षण असू शकेल.

७) अपचन : बद्धकोष्ठता, भूक न लागणे, पोट फुगणे, आम्लपित्त, जेवणानंतर अस्वस्थ वाटणे ही लक्षणेही असंतुलनाची असू शकतात.

८) निद्राविकार : संप्रेरकांची समस्या असल्यास निद्रानाश, खंडित निद्रा व नऊ तासांपर्यंत झोपूनही थकलेपण जाणवते.  संप्रेरके असंतुलनावर मात करण्यासाठी योग्य व निरोगी जीवनशैली अवलंबावी लागेल. चल पद्धतीचे व्यायाम, प्राणायामासारखे श्वसनाचे व्यायाम, तणाव व्यवस्थापन आणि वैद्यकीय उपचार उपयोगी ठरतात.