जीवनशैली आणि आहारामधील बदलाने चेहऱ्यावर मुरूम, त्वचेचा कोरडेपणा आणि डलनेस सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. मुरूम आल्याने चेहऱ्याची सुंदरता बिघडू शकते. भितीपोटी काही व्यक्ती चेहऱ्यावरील मुरुमांना बोट लावतात किंवा हानी पोहोचवतात. त्यामुळे, समस्या अधिक वाढू शकते. मुरुमांमुळे अधिक समस्या होऊ नये यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याबाबत आज आपण जाणून घेऊया.

चेहऱ्यावर मुरूम आल्यावर हे करू नये

१) मुरुमांना स्पर्श करू नका

चेहऱ्यावर मुरूम आल्यावर लोक त्यास आरशामध्ये पाहून स्पर्श करतात. परंतु, यामुळे त्वचेचा संसर्ग होण्याचा धोका असतो. अस्वच्छ बोटांनी मुरुमांना स्पर्ष केल्यास त्यावरील घाण ही मुरुमांना लागू शकते. याने त्वचेचा संसर्ग होऊ शकतो. मुरुमांना अधिक स्पर्ष केल्यास ते फुटू शकतात. फुटल्यावर चेहऱ्यावर डाग पडतात.

(‘या’ ३ जीवनसत्वांच्या कमतरतेने दातांमध्ये होतात वेदना, आहारात करा हा बदल)

२) अनेकदा फेस वॉश करणे

लोक अनेकवेळा मुरुमांपासून सुटक मिळवण्यासाठी फेश वॉश करतात. असे केल्याने त्वचा कोरडी आणि निर्जिव होते. त्वचेचा ओलावा संपल्याने चेहरा वेगळाच दिसून येतो. म्हणून अनेकदा फेश वॉश करू नका. हिवाळ्यात तर ही चूक करूच नका. दिवसातून दोनवेळा फेस वॉश करणे पुरेसे आहे.

३) चुकीच्या पद्धतीने फेस वॉश करणे

फेस वॉश हे चहरा स्वच्छ करण्यात मदत करते. पण चेहऱ्यासाठी योग्य फेस वॉश न वापरल्यास ते नुकसानदायी ठरू शकते. आधी तुमची त्वचा तेलकट, कोरडी, सामान्य किंवा इतर काही प्रकारची आहे का, हे तज्ज्ञांकडून जाणून घ्या आणि त्यांच्याकडूनच कुठले फेसवॉश वापरावे याबाबत सल्ला घ्या.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)