Best Sleeping Position In Ayurveda: आयुर्वेद असो किंवा आधुनिक विज्ञान, आपल्या मनाच्या आणि शरीराच्या निरोगी कार्यासाठी रात्रीच्या चांगल्या झोप आवश्यक असल्याचे सर्वच सांगतात. झोपेची कमतरता आरोग्यावर परिणाम करू शकते. तुम्हाला हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या गंभीर आजार उद्भवू शकतात. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे तुम्ही पुरेसे तास झोपत आहात का यासह, तुम्ही योग्य दिशेला डोकं करून झोपत आहात का याकडेही विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित करताना, केरळ आयुर्वेद विभागाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण गोपीनाथ सांगतात की, “शेतकरी अनेकदा त्यांचे शेत पडीक ठेवता, ज्यामुळे माती पुन्हा सुपीक होते. झोप त्याच पद्धतीने कार्य करते – झोपेचा कालावधी असा आहे जेव्हा आपण नवीन सुरुवात आणि उत्पादक दिवसासाठी आपल्या इंद्रियांचे नूतनीकरण आणि पुनरुज्जीवन करतो. आयुर्वेदानुसार जीवनाच्या आवश्यक त्रय उपस्तंभांमध्ये आहार, लैंगिक संबंध व तिसरे स्थान निद्रेला दिले जाते. आयुर्वेदातील प्रमुख योगदानकर्ते आचार्य चरक झोपेला ‘भूतधात्री’ असे संबोधतात, “निवांत झोप आपल्या शरीराला आईप्रमाणे पोषण देते”

अनेकांना शांत झोपेचे सुख लाभत नाही. आपण अनेकदा यासाठी जीवनशैलीला दोष देतो. मात्र तुम्ही ज्या दिशेला झोपता त्यावरही तुम्हाला उत्तम झोप मिळणार हे अवलंबून असते. चला तर जाणून घेऊयात झोपण्यासाठी बेस्ट पद्धत कोणती..

झोपण्याची सर्वोत्तम दिशा

आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार सावलिया यांच्या मते, दक्षिणेकडे डोके ठेवून झोपावे. दक्षिण नकारात्मक चार्ज आहे आणि तुमचे डोके सकारात्मक चार्ज आहे, जर तुम्ही उत्तरेकडे डोके ठेवून झोपल्यास ऊर्जा बाहेर फेकली जाते व दक्षिणेकडे डोके असल्यास आरोग्य, आनंद आणि समृद्धी वाढवणारी ऊर्जा तुमच्या शरीरात खेचली जाते.

यावर डॉ गोपीनाथ सांगतात की पौराणिक कथांमध्ये, दक्षिण ही भगवान यमाची दिशा असल्याचे मानले जाते, याचा अर्थ असा आहे की तुम्ही या दिशेने अखंड झोप आणि दीर्घायुष्य प्राप्त करू शकता.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासासाठी काही स्वयंसेवकांना 12 आठवडे दक्षिण दिशेला डोके करून झोपण्याची सूचना करण्यात आली होती. यानंतर त्यांचा सिस्टोलिक रक्तदाब, डायस्टोलिक रक्तदाब, हृदय गती संतुलित आणि सीरम कॉर्टिसॉल कमी झाल्याचे निदर्शनात आले.

How To Sleep Faster: आज रात्री लहान बाळासारखी झोप घ्या; झोपेचा ‘१०-३-२-१-०’ नियम काय सांगतो पाहा

झोपेची सर्वात वाईट दिशा

डॉ. गोपीनाथ यांनी सांगितल्याप्रमाणे दक्षिण दिशेला झोपण्याचे फायदे आहेत. मात्र त्यांनी झोपताना उत्तरेकडे तोंड करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. याचे कारण असे की “उत्तरेकडे झोपल्याने पृथ्वीचा सकारात्मक ध्रुव आपल्या शरीराच्या सकारात्मक ध्रुवाशी एकरूप होतो, त्यामुळे तुम्हाला वाईट स्वप्ने पडतील आणि निद्रानाशाचा त्रास होईल. हे चुंबकत्व, आयुर्वेदिकदृष्ट्या, रक्ताभिसरण अडवून मनाला अशांत करते.”

पूर्व आणि पश्चिम दिशा म्हणजे..

पूर्व: डॉ गोपीनाथ सांगतात की, पूर्व ही झोपण्याची दिशा विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर मानली जाते कारण ती स्मरणशक्ती वाढवणारी मानली जाते. “जसा सूर्य पूर्वेला उगवतो, ही दिशा बुद्धी आणि सर्जनशीलता वाढवून सकारात्मक ऊर्जा दर्शवते. डॉ डिक्सा सुद्धा याचे समर्थन करत सांगतात की ही दिशा एकाग्रता सुधारण्यास मदत करते.

Samudrik Shastra: झोपण्याची पद्धत सांगते तुमचा स्वभाव

पश्चिम: वास्तुशास्त्र सांगते की ही प्रयत्नांची दिशा आहे जी तुम्हाला अस्वस्थ करणारी स्वप्ने देऊ शकते आणि रात्रीची शांत झोप होत नाही. डॉ गोपीनाथ असेही सांगतात, कमी झोप कधी कधी काही जणांना यशस्वी बनवते, म्हणून ज्यांना झोपेच्या गुणवत्तेची चिंता नाही त्यांनी पश्चिमेला तोंड करून झोपावे.