Ayurvedic Remedy for White Hair: आजकाल वयाच्या २५ वा ३० व्या वर्षातच लोकांच्या केसांना पांढरं रूप येतंय. पूर्वी जेव्हा हे फक्त वय वाढल्यानंतर घडायचं, ते आता तरुण वयातच दिसू लागलं आहे. त्यामागे चुकीचा आहार, सततचा ताण, झोपेची कमतरता, प्रदूषण व केसांवर वापरण्यात येणारी रासायनिक उत्पादनं ही प्रमुख कारणं आहेत.

अनेक जण यावर उपाय म्हणून महागडे हेअर कलर वापरतात; पण त्यामुळे काही काळापुरताच फरक पडतो आणि केसांचं कायमचं नुकसान होऊ शकतं. पण ,आता आयुर्वेदातून समोर आलाय एक असा उपाय, ज्यामुळे नैसर्गिकरीत्या केस काळे होण्यास मदत होऊ शकते आणि तोही घरच्या घरी! एक प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात की, तुमच्या स्वयंपाकघरातच आहे असं काही, जे फक्त मोहरीच्या तेलात मिसळून लावलं, तर पांढरे केस नैसर्गिकरीत्या काळे होऊ शकतात, तेही कोणत्याही साइड इफेक्टशिवाय. हा खास उपाय फेमस आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांनी त्यांच्या यूट्युब चॅनेलवर शेअर केला आहे. तुमच्या केसांचं नशीब बदलू शकणारा हा उपाय जाणून घ्यायचाय? मग ही बातमी तुम्हासाठीच आहे…

काय आहे हा उपाय?

डॉ. जैदी यांच्या मते, आयुर्वेदात एक विशिष्ट तेल आहे, जे पांढरे केस कमी करण्याच्या दृष्टीनं प्रभावी ठरू शकतं. हे तेल घरीच बनवता येतं आणि कोणत्याही रसायनाशिवाय ते केसांना पोषण देतं.

त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी:

  • मोहरीचं तेल – २०० मिली
  • भृंगराज – २० ग्रॅम
  • जटामांसी – २० ग्रॅम
  • सुका आवळा – ५ ग्रॅम
  • मेथी दाणे – २५ ग्रॅम

हे सर्व साहित्य एका काचेच्या बरणीत घालून १०-१२ दिवस उन्हात ठेवा. त्यानंतर लोखंडी कढईत हे तेल थोडं गरम करून थंड होऊ द्या. तयार तेल दररोज रात्री केसांच्या मुळांना लावा आणि सकाळी सौम्य शॅम्पूने केस धुवा.

किती काळात दिसेल परिणाम?

जर वय ३०-३५ वर्षांपेक्षा कमी असेल, तर २-३ महिन्यांतच केस पुन्हा काळे होऊ लागतील, असा दावा डॉक्टर जैदी करतात. वय जास्त असले तरी केस अधिक पांढरे होणं थांबू शकतं. सर्वांत महत्त्वाचं – हा उपाय संपूर्ण नैसर्गिक असून कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत.

तुम्हीही सतत पांढऱ्या होणाऱ्या केसांमुळे त्रस्त असाल, तर एकदा हा घरगुती उपाय जरूर करून बघा.
पाहता पाहता फरक जाणवू लागेल – आणि केसांना मिळेल नैसर्गिक काळसर चमक!

(टीप : वरील माहिती आयुर्वेदिक तज्ज्ञाच्या सल्ल्यावर आधारित आहे. कृपया कोणताही उपाय वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा.)