पाठदुखी, विशेषतः कंबरदुखी, ही एक सामान्य समस्या आहे, जी आपल्यापैकी अनेकांना जाणवते. वय वाढत असताना ही समस्या अधिक त्रासदायक बनते. डेस्कवर काम करणारे बहुतेक लोक पाठदुखीची तक्रार करतात. स्नायूंना दुखापत होणे हे पाठदुखीचे एक सामान्य कारण आहे. चुकीच्या पद्धतीने उठणे, चुकीची स्थिती व व्यायाम न करणे यांमुळे ही वेदना होऊ शकते. वाढत्या वजनामुळेही पाठदुखी होते. जास्त वजनामुळे पाठीवर ताण येण्याचा धोका वाढू शकतो. या कारणांमुळे होणारी पाठदुखी जीवनशैली बदलून बरी होऊ शकते. जर ही वेदना सतत आणि अत्यंत त्रासदायक असेल, तर त्याचे कारण कर्करोगदेखील असू शकते.
पाठदुखी ही एक सामान्य समस्या आहे म्हणून लोक सहसा असे गृहीत धरतात की, पाठीत होणारा कोणताही त्रास किंवा अस्वस्थता स्नायूंच्या समस्येमुळे असू शकते. पण तुम्हाला माहीत आहे का की, पाठदुखी कर्करोगामुळेदेखील होऊ शकते? कोणत्या कर्करोगांमुळे पाठदुखी होऊ शकते आणि ती सामान्य वेदनेपेक्षा कशी वेगळी आहे ते जाणून घेऊया.
या ४ प्रकारच्या कर्करोगांत पाठदुखी सामान्य आहे
कर्करोगाच्या रुग्णांमध्ये पाठदुखी हे मेटास्टेसिसचे लक्षण असू शकते, जिथे कर्करोग पाठीपर्यंत पसरतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, स्तन, फुप्फुस, वृषण व आतड्याचा कर्करोग हे चार सामान्य प्रकारचे कर्करोग आहेत, जे पाठीत पसरण्याची शक्यता जास्त असते. हे मणक्याच्या जवळ असतात, त्यामुळे पाठदुखीची समस्या त्यांच्यामुळे जास्त असते.
पाठदुखी आणि फुप्फुसांचा कर्करोग
कॅन्सर रिसर्च यूकेच्या मते, फुप्फुसाच्या कर्करोगाच्या २५ टक्के रुग्णांना पाठदुखीची तक्रार असेल. अहवालानुसार, जर फुप्फुसाचा कर्करोग हाडांमध्ये पसरला, तर पाठीच्या खालच्या भागात वेदना जाणवू शकतात. रात्री घाम येणे, थंडी वाजून येणे, ताप येणे, आतड्यासंबंधी व मूत्राशयाच्या समस्या आणि अचानक वजन कमी होणे यांसारख्या फुप्फुसांच्या कर्करोगाच्या इतर लक्षणांसह ही पाठदुखी दिसून येतो. तुमचे शरीर सामान्यपेक्षा जास्त ऊर्जा खर्च करते, त्यात कोणताही व्यायाम किंवा आहार न घेता, त्यामुळे वजन कमी होते.
कर्करोगाच्या पाठदुखी आणि मस्क्युलोस्केलेटल पाठदुखीमधील फरक
औषधोपचाराने सामान्य पाठदुखी कमी होते; परंतु कर्करोगामुळे होणारी वेदना कायम राहते. अशा स्थिती किंवा पोश्चरमध्ये कोणताही बदल करूनही ही वेदना कमी होत नाही. कर्करोगामुळे होणारी वेदना सौम्य असते आणि ती दुर्लक्षित राहू शकते.
डॉक्टरांना कधी भेटावे?
जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे आढळली, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना भेटावे. जर पाठदखीची वेदना असामान्य वाटत असेल,तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.