Natural Remedies for Cholesterol: आजच्या धावपळीच्या आयुष्यात हार्ट अटॅक, कार्डिअॅक अरेस्ट यांसारख्या घटना वाढत आहेत. डॉक्टर, हॉस्पिटल, महागडी औषधं… सगळं करूनही माणूस हृदयाच्या आजाराच्या भीतीमध्ये जगतो. पण, कधी तुम्ही विचार केलाय का, तुमच्या स्वयंपाकघरातच असा एक पदार्थ लपलेला आहे, जो तुमच्या हृदयासाठी ढाल बनू शकतो? होय, आपल्या शरीरात हळूहळू साचणारं वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) हा हृदयविकारास कारणीभू हार्ट प्रॉब्लेम्सचा गुप्त शत्रू. रक्तवाहिन्यांतल्या भिंतींवर त्याचे थर जमा होतात आणि मग त्यातून अचानक ब्लॉकेज तयार होतो. अशा वेळी ‘तो एक’ नैसर्गिक पदार्थ आपल्या मदतीला धावून आला, तर?

संशोधन काय सांगतं?

National Library of Medicine मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका महत्त्वाच्या संशोधनात आश्चर्यकारक निष्कर्ष दिसून आले. अभ्यासात सहभागी झालेल्या व्यक्तींना दररोज तीन ग्रॅम या प्रमाणात ४५ दिवस सुंठ (आल्याची पावडर) देण्यात आली. या चाचणीतून दिसून आलेले परिणाम थक्क करणारे होते. त्या व्यक्तींच्या शरीरातील LDL (वाईट कोलेस्ट्रॉल) आणि ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाण लक्षणीयरीत्या घटलं असल्याचं दिसून आलं. आणखी एकदा घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये तर कोलेस्ट्रॉलचा त्रास असलेल्या लोकांच्या लिपिड प्रोफाइलमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून आली.

शरीरावर कसा होतो परिणाम?

  • सूज कमी करणारे घटक – शरीरातील ‘क्रॉनिक इन्फ्लेमेशन’ हेच रक्तवाहिन्यांना कमकुवत करतं. आल्यामधील जिंजरॉल्स आणि शोगॉल्स हे घटक सूज कमी करतात.
  • कोलेस्ट्रॉल निर्मितीवर नियंत्रण – आलं यकृतात कोलेस्ट्रॉल तयार करणाऱ्या एंझाइम्सना थोपवतं, आणि आतड्यात होणारं त्याचं शोषण कमी करतं.
  • अँटिऑक्सिडंट्सची शक्ती – आलं फ्री रॅडिकल्सना निष्प्रभ करून, LDL ‘ऑक्सिडाइज’ होऊ देत नाही. त्यामुळे धोकादायक ब्लॉकेज टाळले जातात.

दैनंदिन आहारात कसं घ्याल?

  • सकाळच्या चहात आलं घाला
  • सुप, भाजीत थोडं किसून वापरा
  • स्मूदी किंवा हर्बल ड्रिंकमध्ये मिसळा
  • किंवा पावडर/कॅप्सूल स्वरूपातही घेऊ शकता

आता तुम्हाला कळलं असेल की, हा जादुई नैसर्गिक पदार्थ दुसरातिसरा काही नसून, तर तो आपल्या सर्वांच्या घरात असतो आणि तो म्हणजे साधं आलं (Ginger).

आलं इतकं खास का?

स्वयंपाकघरातल्या साध्या मसाल्याच्या रूपात आलं रोज वापरलं जातं; पण हा मसाला फक्त सर्दी-खोकल्यावरच उपयोगी नाही, तर तो हृदयाचंही आरोग्य जपतो, सूज कमी करतो आणि रक्तवाहिन्यांमधील चरबीच्या थरांना रोखतो. संशोधनातून हे स्पष्ट झालं आहे की, आल्याचं नियमित सेवन केल्यानं LDL (वाईट कोलेस्ट्रॉल) कमी होतं आणि रक्तवाहिन्या स्वच्छ होतात. त्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

दररोजच्या नियमित आहारात आल्याचा समावेश केल्यास तुमचं हृदय मजबूत राहू शकतं, वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकतं आणि अचानक उदभवणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होऊ शकतो.

म्हणजेच औषधं, व्यायाम, झोप यांबरोबर आलं हेच हृदयाचं गुप्त शस्त्र आहे