Bad Foods for Brain: आपला मेंदू आपल्या संपूर्ण शरीराला आपल्या आदेशानुसार काम करायला लावतो. आपला प्रत्येक विचार, आठवण, भावना आणि निर्णय घेण्याची क्षमता याच्यावरच अवलंबून असते. जेव्हा मेंदू काम करणं थांबवतं, तेव्हा त्याला ‘डेड ब्रेन’ म्हटलं जातं. शरीराच्या या महत्त्वाच्या अवयवाला निसर्गाने खूप सुरक्षित जागेत ठेवलेलं आहे, जेणेकरून त्याला कोणतीही इजा किंवा नुकसान होऊ नये. मात्र काही गोष्टी या मेंदूला खूप हानी पोहोचवतात.
वाईट आहार घेणं आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. आपण नकळत असे अनेक पदार्थ खातो, जे शांतपणे आपल्या मेंदूला नुकसान पोहोचवत असतात. असे पदार्थ खाल्ल्याने स्मृती कमी होते, लक्ष केंद्रित करायला अडचण येते आणि चिंता किंवा डिमेन्शिया सारख्या आजारांचा धोका वाढतो.
फोर्टिस रुग्णालयाच्या हेल्थ केअर वेबसाइटनुसार काही खाद्यपदार्थ मेंदूवर हळूहळू विषासारखा परिणाम करतात. जर तुम्ही रोज असे पदार्थ खाल्ले, तर मेंदूला पुरेसे पोषण मिळणार नाही आणि मेंदूचं नुकसान होईल. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते वाईट पदार्थ आहेत, जे तुम्ही तुमच्या आहारातून लगेच काढून टाकले पाहिजेत. या पदार्थांच्या ऐवजी आरोग्यदायी पदार्थ खाल्ले, तर तुम्ही तुमचं मानसिक आरोग्य आणि भावनिक संतुलन राखू शकता.
हे स्वीड ड्रिंक्स मेंदूसाठी विष आहे
सोडा आणि एनर्जी ड्रिंकसारखे काही पेय मेंदूच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. या ड्रिंकमध्ये साखर जास्त असते, जी अचानक रक्तातील साखरेची पातळी वाढवते. यामुळे मेंदूमध्ये सूज येऊ शकते आणि अल्झायमरसारख्या आजारांचा धोका वाढतो. या ड्रिंक घेतल्यावर थोड्या वेळासाठी तरतरी वाटते, पण लगेच थकवा आणि चिडचिडेपणा जाणवतो. जर तुम्हाला मेंदू तंदुरुस्त ठेवायचा असेल आणि स्मृती मजबूत करायची असेल, तर लिंबू, काकडी टाकून पाणी प्या. हे पेय ताजेतवाने करेल आणि मेंदूला आरोग्यदायी ठेवेल.
ट्रान्स फॅटपासून दूर राहा
जर तुम्हाला मेंदू तंदुरुस्त ठेवायचा असेल, तर पॅकबंद स्नॅक्स खाणं टाळा. या पदार्थांमध्ये असणारे कृत्रिम ट्रान्स फॅट्स मेंदूपर्यंत रक्ताचा प्रवाह कमी करतात आणि मेंदूची कार्यक्षमता घटवतात. जर तुम्ही सतत असे पदार्थ खाल्ले, तर स्मृती कमजोर होऊ शकते आणि मूड स्विंग्स येऊ शकतात. मेंदूचं नुकसान करणाऱ्या पदार्थांऐवजी असे पदार्थ खा जे मेंदूला तंदुरुस्त ठेवतात. काही हेल्दी फॅट्स जसे की ॲव्होकॅडो, ड्रायफ्रूट्स आणि ऑलिव्ह ऑईलचा वापर करा. हे पदार्थ मेंदूला ऊर्जा देतात आणि संतुलन राखतात.
रिफाइंड कार्ब्स टाळा
रिफाइंड कार्ब्स जसं की व्हाइट ब्रेड आणि पेस्ट्री खाल्ल्याने मेंदूचं आरोग्य बिघडू शकतं. या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो, ज्यामुळे ब्रेन फॉग येतो आणि ऊर्जा कमी होते. हे पदार्थ खाल्ल्यावर थोडा वेळ पोट भरल्यासारखं वाटतं, पण लक्ष केंद्रित करणं आणि जागरूकता कमी होते. अशा पदार्थांच्या ऐवजी तुम्ही क्विनोआ, ओट्स आणि ब्राउन राइससारखे पदार्थ खा. हे पदार्थ मेंदूला स्थिर ठेवतात आणि ऊर्जा वाढवतात.
प्रक्रिया केलेले अन्न मेंदूचे शत्रू
खूप जास्त प्रोसेस्ड फूड्स (प्रक्रिया केलेले अन्न) जसं की फ्रोजन फूड आणि इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने मेंदूचं आरोग्य बिघडू शकतं. अशा फूड्समध्ये अॅडिटिव्ह्ज, प्रिझर्वेटिव्ह्ज आणि खूप मीठ असतं, जे हळूहळू मेंदूच्या पेशींना नुकसान पोहोचवतं. या फूड्समुळे चिंता आणि डिप्रेशनचा धोका वाढतो. मेंदू तंदुरुस्त ठेवायचा असेल तर ताजं आणि घरी बनवलेलं अन्न खा. हे मेंदू आणि शरीर दोघांसाठी फायदेशीर असतं.