बजाज ऑटोने Bajaj Platina 110 H-Gear ही नवी दुचाकी लाँच केली आहे. ही बाइक 5 स्पीड गिअरबॉक्स, गिअरशिफ्ट गाइडसाठी नवीन डिजिटल इंस्ट्रूमेंट पॅनल, ट्रिप मीटर आणि फ्युअल इंडिकेटरसह बाजारात उतरवण्यात आली आहे. नवी प्लॅटिना ड्रम ब्रेक आणि डिस्क ब्रेक अशा दोन व्हेरिअंट्मध्ये उपलब्ध असेल.
ही बाइक देशभरातील डिलर्सकडे ब्ल्यू डेकल्स, इबोनी ब्लॅक आणि कॉकटेल वाइन रेड या तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. दुचाकीच्या वेगानुसार गिअर कधी बदलावा याबाबत योग्य माहिती गिअरशिफ्ट गाइडद्वारे मिळेल. मोटरसायकल नेहमी योग्य गिअरवर धावावी आणि दर्जेदार अनुभव मिळावा यासाठी हे फीचर उपयोगी पडेल. यातील पाचव्या गिअरला हायवे गिअर असं नाव देण्यात आलं असून दूरच्या प्रवासात उत्तम पर्फॉर्मंस आणि मायलेज मिळावा यानुसार हा गिअर ऑप्टिमाइज करण्यात आला आहे. जलदगतीने गिअर बदलता यावेत यासाठी यामध्ये नवीन फेदर टच गिअर शिफ्ट मॅकेनिझम आहे. याशिवाय नव्या प्लॅटिनामध्ये अँटी-स्किड ब्रेकिंग सिस्टिम, नायट्रॉक्स सस्पेंशनसह ComforTech तंत्रज्ञान, लांब सीट, ट्युबलेस टायर आहे. यात 115.5cc एअर-कुल्ड DTS-I इंजिनचा वापर करण्यात आला असून हे इंजिन 8.6hp ची ऊर्जा आणि 9.81Nm टॉर्क निर्माण करतं. बाइकमध्ये नवीन 3D लोगो देण्यात आला आहे. बजाज ऑटोची सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडल्समध्ये प्लॅटिनाचा समावेश होतो.
किंमत – यातील ड्रम ब्रेक व्हेरिअंटची किंमत 53 हजार 376 रुपये इतकी (दिल्ली एक्स-शोरूम) आहे, तर डिस्क ब्रेकची व्हेरिअंटची किंमत 55 हजार 373 (दिल्ली एक्स-शोरूम) रुपये इतकी आहे.