भारतासह जगभरातील तरुणांमध्ये बाइक मॉडिफाय करण्याचं एक वेगळंच क्रेझ आहे. भारतात बाइक मॉडिफाय करणं अवैध आहे, पण तरीही अनेक तरुण आपली बाइक मॉडिफाय करत असल्याचं सर्रास दिसतं. सध्या सोशल मीडियामध्ये बजाज कंपनीची देशातील लोकप्रिय बाइक Pulsar 220 चा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये पल्सरच्या पुढच्या चाकाच्या जागी चक्क ट्रॅक्टरचा भलामोठा टायर लावण्यात आल्याचं दिसतंय. पुढे इतका मोठा टायर लावल्याने गाडीचे सस्पेन्शनही हटवण्यात आले आहेत. पुढे ट्रॅक्टरचा टायर फिट करण्यासाठी बाइकमध्ये काही बदल करण्यात आलेत. पुढच्या चाकासाठी कोणताही ब्रेक देण्यात आलेला नाही. ट्रॅक्टरच्या टायरचा आकार किती आहे हे समजू शकलेलं नाही, पण पल्सर 220 साठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा टायर आहे हे मात्र नक्की. युट्यूबवर MR. INDIAN HACKER नावाच्या एका चॅनलने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये दुचाकीस्वार तरुण ओबडधोबड रस्त्यावरही ही बाइक अगदी आरामात चालवताना दिसतोय. पुढचा टायर जाड असल्यामुळे वळण घेताना मात्र त्याला थोडे कष्ट घ्यावे लागतायेत.

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
civil service servants vehicle with a board coming to wrong side
चक्क अधिकाऱ्याच्या गाडीने मोडला वाहतूक नियम! भर रस्त्यावर थांबवताच पेटला वाद, पाहा VIDEO
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर

(Bajaj Auto ने केली घोषणा, महाराष्ट्रात करणार 650 कोटींची गुंतवणूक; पुण्याच्या चाकणमध्ये….)

बघा व्हिडिओ :-

पल्सर प्रेमींमध्ये सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. बजाज कंपनीची पल्सर ही सर्वाधिक विक्री होणारी बाइक आहे.