Simple Tips and Tricks for the Storage of Banana: आपल्यापैकी बऱ्याच जणांना केळी खायला आवडतात. केळी आरोग्यासाठी खूप चांगली असतात. केळी प्रत्येक मोसमात बाजारात उपलब्ध असतात. अगदी हौशेने डझनभर केळी आपण बाजारातून घरी घेऊन येतो, पण ती अवघ्या काही दिवसांतच काळी पडून मग खराब होऊ लागतात. केळी इतर फळांपेक्षा लवकर पिकतात आणि काळी पडू लागतात. उन्हाळ्यात हे फळ टिकणं कठीणच. उन्हाळ्यात उष्णतेमुळे केळी लवकर कुजायला लागतात किंवा खराब होऊ लागतात. केळी खराब झाली, काळी पडली म्हणून टाकून द्यावी लागतात. उन्हाळ्यातही काही सोप्या टिप्सच्या मदतीने आपण केळी योग्यरित्या ठेवून खराब होण्यापासून वाचवू शकता. चला तर मग, जाणून घेऊया काही सोप्या आणि प्रभावी टिप्सद्वारे, केळी जास्त दिवस कशी ठेवता येतील!
केळी इतर फळांपेक्षा लवकर पिकतात आणि काळी पडू लागतात. केळी फ्रिजमध्ये ठेवणे योग्य नाही, कारण त्याचा पोत आधीच थंड आहे, तेव्हा केळी रेफ्रिजरेटरमध्ये न ठेवता, अनेक दिवस कशी साठवायची ते आपण जाणून घेऊ.
उन्हाळ्यात केळी जास्त दिवस ताजी राहावीत यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
१. केळी बाजारातून खरेदी करून आणल्यावर त्यांच्या देठावर पेपर किंवा प्लास्टिक रॅप करा, त्यामुळे ती केळी जास्त दिवस ताजी राहू शकतात.
२. केळी जास्त दिवस राहिल्यास खाली टोकाकडील भागाकडून खराब होतात. केळी जर खाली ठेवली तर ती पटकन पिकतात. खालच्या भागावर काळे डाग पडू लागतात, त्यामुळे तुम्ही केळ्यांसाठी हँगर वापरू शकता. केळी ठेवण्यासाठी हँगर्सचा वापर केल्याने ती जास्त दिवस चांगली राहतात.
३. वॅक्स पेपरमध्ये केळी गुंडाळून झाकून ठेवली तर ती लवकर खराब होत नाहीत. या ट्रिकमुळेही केळी फ्रेश राहतात.
४. केळी खराब होऊ नयेत म्हणून तुम्ही व्हिटॅमिन सी टॅबलेटचीही मदत घेऊ शकता. त्यासाठी व्हिटॅमिन सीची एक गोळी थोड्या पाण्यात विरघळवून घ्या आणि या पाण्यातून केळी काढा किंवा त्यावर पाणी शिंपडा, त्यामुळे तुमची केळी जास्त काळ ताजी राहतील.
५. तुम्ही केळ्यांचे देठ पॉलिथिनमध्ये लपेटून ठेवू शकता, त्यामुळे केळी फ्रेश राहण्यास मदत मिळते. तसेच केळी लवकर काळी पडत नाहीत. पॉलिथिनमधील थंडावा जपून ठेवण्यास मदत करते.
६. केळी फ्रिजमध्ये अजिबात ठेवू नका. केळी आणल्यानंतर नेहमी रूम टेंपरेचरवरच ठेवा. बाहेर केळी अधिक काळ टिकतात. फ्रिजमध्ये केळी मऊ पडतात आणि लवकर काळी होतात.
वरील सांगितलेल्या ट्रिक्सचा वापर केल्यास केळी लवकर खराब होणार नाहीत आणि जास्त दिवस फ्रेश राहतील.