May 2024 Bank Holiday List: एप्रिलमधील वाढती उष्णता बघता मे महिन्यात सकाळपासूनच अंगाची कशी लाही लाही होईल याचा विचारही करायला नको. अशावेळी समजा एखाद्या महत्त्वाच्या कामानिमित्त तुम्हाला बँकेत जावं लागणार असेल, मनावर दगड ठेवून तुम्ही घराबाहेर पडलात, नखशिखांत घामाने भिजून बँकेपर्यंत पोहोचलात आणि मग “अरे भाऊ आज तर बँक हॉलिडे” आहे असं कुणी सांगितलं तर? जाऊदे ना असा विचारही करू नका त्याऐवजी आजच मे महिन्यातील बँक हॉलिडेजची ही यादी पाहून ठेवा.

मे महिन्यात विविध सण आहेत. अगदी पहिल्याच दिवशी महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा केला जातो. त्यापाठोपाठ, अक्षय्य तृतीया, बुद्ध पौर्णिमा असे सणही असतात. तसेच यंदा लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने प्रत्येक टप्यातील मतदानाच्या तारखांनुसार त्या त्या दिवशी बँक हॉलिडे असणार आहे. आपल्या जिल्ह्यातील निवडणुक मतदानाच्या तारखेनुसार ही सुट्टी असेल.

तुम्हाला माहित आहे का, भारतातील बँकांच्या सुट्ट्या या १८८१ च्या राज्य सरकार, केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश कायद्यांतर्गत सूचीबद्ध आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) तर्फे दरवर्षी संपूर्ण वर्षासाठी बँकांच्या सुट्टीचे कॅलेंडर प्रकाशित केले जाते. हे कॅलेंडर सर्व बँकांद्वारे फॉलो करणे अनिवार्य असते. यानुसार यंदा मे महिन्यात किती व कोणते बँक हॉलिडे असणार हे पाहूया..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मे २०२४ बँक हॉलिडे यादी: ‘या’दिवशी बँकेची कामं काढूच नका

तारीख दिवस निमित्त 
१ मे २०२४बुधवारमहाराष्ट्र दिन/कामगार दिन
५ मे २०२४रविवार सार्वजनिक सुट्टी
११ मे २०२४शनिवार (दुसरा शनिवार) सार्वजनिक सुट्टी
२३ मे २०२४गुरुवार बुद्ध पौर्णिमा
२५ मे २०२४शनिवार (चौथा शनिवार) सार्वजनिक सुट्टी

दरम्यान, हे ही लक्षात घ्या, या सुट्टीच्या दिवशी ऑफलाइन बँकेच्या केवळ शाखा बंद राहतील, मात्र, मोबाइल बँकिंग, UPI आणि इंटरनेट बँकिंग यासारख्या डिजिटल सेवा अखंडपणे चालू असतात. खालील सुट्ट्यांच्या कॅलेंडरच्या व्यक्तिरिक्त बँकेच्या वेळापत्रकातील कोणतेही अतिरिक्त बदल हे ग्राहकांना आधीच कळवले जातात.