बँकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 150 पदांसाठी भरती होत असून आज(६, एप्रिल) यासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. जनरल ऑफिसर पदासाठी ही भरती आहे. जाणून घेऊया सविस्तर :-

ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 22 मार्च 2021
ऑनलाईन अर्ज भरण्याची आणि शुल्क जमा करण्याची अखेरची तारीख : 06 एप्रिल 2021

Pune, Father, murder son, pune latest news,
पुणे : वडिलांनी दिली मुलाला मारण्यासाठी ७५ लाखांची सुपारी
Mahavitaran Jobs
Mahavitaran Jobs : महावितरण मध्ये नोकरीची संधी! ५३४७ रिक्त जागांसाठी आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Recruitment for assistant professor post
मुंबईच्या TISS मध्ये ‘या’ पदासाठी भरती होणार! २८ एप्रिलआधी करा अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष
Jilhadhikari Karyalay Kolhapur Bharti 2024
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत १८ जागांसाठी भरती; जाणून घ्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख

वयोमर्यादा :
या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 25 ते 35 वर्षे असणे आवश्यक आहे.

आरक्षणनिहाय पदसंख्या
एकूण जागा – 150
खुल्या वर्गासाठी – 62
ओबीसी – 40
एससी – 22
एसटी – 11
ईडब्ल्यूएस -15

शैक्षणिक पात्रता :-
कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून किमान ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (एससी/एसटी/ओबीसी/ PWD: 55 टक्के गुण) किंवा CA / ICWA / CFA / FRM) ३ वर्षे अनुभव आवश्यक.

अर्ज शुल्क :-
खुल्या, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 1180 रुपये शुल्क भरावे लागेल. तर, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 118 रुपये शुल्क भरावे लागेल. दिव्यांग आणि महिला उमेदवारांना अर्ज भरण्याची प्रक्रिया मोफत असेल.

निवड प्रक्रिया :-
जनरल ऑफिसर पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेच्या आधारे केली जाईल. यशस्वी उमेदवारांना त्यांच्या रँकिंगच्या आधारे मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही http://bankofmaharashtra.in/ आणि https://www.bankofmaharashtra.in/writereaddata/documentlibrary/a0ab94ef-0ae6-4e05-8f2b-2b5d0a06c807.pdf या संकेतस्थळांना भेट देऊ शकतात.