प्रत्येक घरातील बाथरूममध्ये प्लास्टिकच्या बादल्या, मग आणि टब यासारख्या वस्तू वापरल्या जातात. पण या वस्तू सतत वापरल्याने त्यावर पाण्यामुळे पिवळसर, चिकट आणि काळे डाग पडतात, पण फार कमी लोक त्याच्या स्वच्छतेकडे लक्ष देतात. पण असे करणे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही, कारण याच बादल्या, टबमधील पाणी तुम्ही आंघोळ आणि कपडे, भांडी धु्ण्यासाठी वापरता. अशावेळी बादल्या आणि मगवर साचलेल्या घाणीचा थर स्वच्छ करण्यासाठी केवळ डिटर्जंटचा वापर केला जातो. पण यामुळे त्याच्यावर जमा झालेली काही केल्या कमी होत नाही. कारण बादल्या, टब डिटर्जंटने कितीही घासल्या, रगडल्यास त्यावरील घाण स्वच्छ होते पण त्या खराब होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी आम्ही तुम्हाला आज अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही बाथरुममधील काळ्या, पिवळसर पडलेल्या अस्वच्छ बादल्या, मग, टप काही मिनिटांत चकाचक करु शकता. चला जाणून घेऊ या ट्रिक्स…
बाथरुममधील बादल्या, टब, मग स्वच्छ करण्याच्या ट्रिक्स
१) बेकिंग सोडा आणि व्हिनेगर
प्लास्टिकच्या बादल्या, टब आणि मग यावरील पाण्यामुळे पडलेले चिकट काळे, पिवळसर डाग काढून टाकण्यासाठी सम प्रमाणात बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिसळून पेस्ट तयार करा. या पेस्टने बादल्या, टब आणि मग नीट घासून स्वच्छ करा.
२) लिंबू
लिंबूमध्ये अॅसिटिक अॅसिड असते, ज्यामुळे प्लास्टिकच्या बादल्या आणि टबवर पडलेले घाणीचे डाग सहज दूर होतात. यासाठी प्लास्टिकच्या बादली आणि मगाचा पृष्ठभागाला लिंबाचा रस लावा आणि ३० मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर डिटर्जंटने ही भांडी स्वच्छ करा.
३) ब्लीच
प्लास्टिकच्या बादल्या आणि मगवरील काळसर, चिकटपणा काढून टाकण्यासाठी तुम्ही ब्लीचचाही वापर करू शकता. यासाठी एक कप पाण्यात ब्लीच मिसळा. नंतर या पेस्टमध्ये स्वच्छ कापड भिजवा आणि त्याने बादली, मग, टब नीट घासून घ्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यानंतर बादली एकदम नव्यासारखी चमकेल. पण लक्षात ठेवा की, हँड ग्लव्स घातल्यानंतरच ब्लीचला हात लावा.