Benefits of being silent: काही लोकांना बोलायला प्रचंड आवडतं तर काही लोकांना नाइलाजाने कामासाठी बोलावे लागते. जास्त बोलण्यामुळे शरीरातील उर्जा कमी होते हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. जर तुम्ही कमी बोलला किंवा शांत राहला तर तुमची उर्जा तुमच्या शरीरात साचून राहते आणि दुसऱ्या कामांसाठी वापरली जाते. त्यामळे कधी कधी कमी बोलणे देखील तुमच्यासाठी चांगले ठरू शकते. डॉक्टर्स सांगतात की, जर तुम्ही एका दिवसामध्ये शांत राहत असाल तर ६ मोठे फायदे होऊ शकतात.

शांत राहण्याचे फायदे


मानसिक शांती मिळते
जर तुम्ही नियमितपणे २४ तासांमधील एक तास मौन राहत असाल तर तुम्हाला मानसिक शांती मिळते. शांत राहण्यामुळे शरीरातील तणवाचे हॉर्मोन्स कमी तयार होतात ज्यामुळे मानसिक शांती मिळते.

भावनिक बंध
तुम्ही जितके शांत राहता तितकावेळ स्वत:च्या अंतरआत्म्यासह संवाद साधता. असे केल्याने तुमचे स्वत:शी एक भावनिक बंध तयार होते. स्वत:च्या भावनांशी जोडले गेल्यानंतर तुम्हाला काय चूक आणि काय बरोबर यातील फरक लक्षात येतो. त्यामुळे जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी मदत मिळते.

हेही वाचा- मधुमेही व्यक्तीने धावू नये का? धावण्यामुळे गुडघ्यांचे नुकसान होते का? काय मिथक आणि काय तथ्य, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….

शांत झोप लागते
२४ तासातील १ तास शांत राहिल्याने तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारू शकते. कारण तुमचे मन शांत असते त्यामुळे रात्रीच्या वेळी पटकन झोप येते. तसेच तुम्हाला गाढ झोप लागते आणि गाढ झोप लागते.

रक्तदाब नियंत्रणात राहतो
उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना दिवसातून १ तास शांत राहिले पाहिजे त्यामुळे मन शांत होते आणि ह्रद्यावरील ताण कमी होतो. शरीराला आराम मिळतो. नियमितपणे मौन राहण्याचा सराव केल्याने ह्राट अटॅक, स्ट्रोक आणि इतर ह्रद्याच्या आरोग्यासंदर्भातील आजारांचा धोका काम होतो.

रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते
कमी बोलण्यामुळे तणव कमी होतो आणि झोप चांगली लागते. दोन्ही गोष्टींमुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते ज्यामुळे आजारासह लढण्याची क्षमता वाढते.

हेही वाचा – सँडविच खाणे आरोग्यासाठी चांगले आहे की नाही? सँडविच खाण्यामुळे वजन वाढते का? जाणून घ्या काय सांगतात आहारतज्ज्ञ…..

चांगले वक्ता होऊ शकता
जितके जास्तवेळ तुम्ही मौन राहता, तितकेच चांगले तुम्ही बोलू शकता. काही संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, शांत राहण्यामुळे जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही चांगले बोलू शकता. अशावेळी तुम्ही तुमच्या शब्दाची निवडीवर विशेष लक्ष देता.

(टिप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)