Benefits Of Coriander Leaves : कोणताही खाद्यपदार्थ कोथिंबिरीने सजवल्यावर खूप छान दिसतो. पण तुम्हाला माहीत आहे का? या कोथिंबिरीत मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक असतात. आपण स्वयंपाकात अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या वापरतो. त्यापैकी एक म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीर प्रत्येक पदार्थाची चव आणि सुगंध वाढवते. ही पाने केवळ चवच वाढवत नाहीत, तर शरीरासाठीही खूप फायदेशीर असतात. आयुर्वेदात कोथिंबीर हे औषध मानले जाते. आयुर्वेदिक आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, कोथिंबीर अनेक पारंपरिक वैद्यकीय पद्धतींमध्येही वापरली जाते. नोंदणीकृत आहारतज्ज्ञ आणि पोषण शिक्षक डॉ. चारू अरोरा यांच्या मते, कोथिंबीर ही आरोग्यासाठी फायदेशीर अन्न आहे. तसेच औषधी गुणधर्मांनीही समृद्ध आहे. कोथिंबिरीमध्ये पौष्टिक गुणधर्म, दाहकविरोधी, प्रतिजैविक, अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत.

पोषण शिक्षक डॉ. चारू अरोरा यांच्या मते, कोथिंबिरीचे पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. हे यकृत आणि किडनीला सुरळीतपणे काम करण्यास मदत करते. कोथिंबिरीमध्ये असलेले फोलेट गर्भवती महिला आणि त्यांच्या पोटातल्या बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. गर्भधारणेदरम्यान तो पोषक घटकांचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉलदेखील संतुलित राहते. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ए त्वचेला चमक देतात.

कोथिंबिरीचे फायदे

तज्ज्ञांच्या मते, कोथिंबीर रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवते आणि पचनसंस्था, यकृत व मूत्रपिंडाचे चे कार्य सुधारते. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि डिटॉक्स गुणधर्म शरीराला आतून स्वच्छ करण्याचे काम करतात. कोथिंबिरीच्या पानांमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. त्यामध्ये अ, क व के या जीवनसत्त्वांचा समावेश आहे, जी डोळे, त्वचा व हाडांसाठी खूप महत्त्वाची आहेत.

पचन आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवते

त्यासोबतच फोलेट, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह व मॅग्नेशियम यांसारखे घटकदेखील त्यात आढळतात. कोथिंबीर पचनसंस्था मजबूत करते. सकाळी रिकाम्या पोटी ही पाने चावून किंवा त्यांचे पाणी प्ययाल्याने गॅस, अ‍ॅसिडिटी व बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. कोथिंबिरीमध्ये असलेले क जीवनसत्त्व शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवते. जर शरीराची रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल, तर सर्दी, खोकला वताप यांसारखे हंगामी आजार सहजासहजी होत नाहीत.

कोलेस्ट्रॉल नियंत्रण

कोथिंबिरीमध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. ते कोलेस्ट्रॉल देखील संतुलित ठेवते. अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ए त्वचेला चमक देतात. ते शरीराला विषमुक्त करते. कोथिंबीर पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते.

कोथिंबिरीच्या जास्त सेवनाचे तोटे

कोथिंबिरीच्या जास्त सेवनामुळे काही लोकांमध्ये त्वचेवर पुरळ उठणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा पोटदुखी यांसारखे अॅलर्जीचे त्रास होऊ शकतात. तसेच मूत्रपिंडावरही याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे याचे फायदे असले तरी याचे सेवन योग्य प्रमाणात करणे गरजेचे आहे.

कोथिंबिरीचे सेवन कसे करावे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेवणात:
कोथिंबिरीची ताजी पाने बारीक चिरून भाजी, डाळ, कढी, सूप किंवा इतर पदार्थांमध्ये टाकून खाऊ शकता.
चटणी :
कोथिंबिरीची पाने, आले, मिरची, लिंबू व मीठ घालून चटणी बनवून खाऊ शकता.
सॅलड:
कोथिंबिरीची पाने चिरून सॅलडमध्ये टाका.
पेये:
कोथिंबिरीची पाने पाण्यात उकळून, थंड झाल्यावर पिऊ शकता.