How Much Water Does Body Need In Summer : पाणी हे जीवन आहे असे आपल्याला लहानपणापासूनच शिकवले जाते, त्यामुळे पाणी अजिबात वाया घालवू नये, त्याचप्रमाणे कमी पाणी प्यायल्यानेसुद्धा अनेक आजार होतात. बऱ्याच लोकांना हिवाळ्यात पाणी पिण्याची इच्छा होत नाही. पण, जर तुम्ही उन्हाळ्यातही हे करत असाल तर ते तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण करू शकतात, त्यामुळे दिवसातून किती पाणी प्यावे याचे नियोजन करणे खूप आवश्यक आहे.

तुमच्या शरीराचे संकेत समजून घ्या : जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हाच पाणी पिण्याचा पुरेपूर प्रयत्न करा.

तुमच्या हालचाली लक्षात ठेवा : जर तुम्ही बाहेर काम करत असाल किंवा शारीरिक हालचाल करत असाल तर तुम्हाला पाण्याची गरज भासू शकते.

सकाळी एक ग्लास पाणी प्या : सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास पाणी प्यायल्याने शरीर ताजेतवाने होते आणि चयापचय सुधारते.

जास्त फळे आणि भाज्या खा : टरबूज, काकडी आणि संत्री यांसारखी फळे आणि भाज्या तुमच्यासाठी सर्वोत्तम असतील.

शरीराला किती पाण्याची आवश्यकता आहे?

साधारणपणे, एका सामान्य व्यक्तीला दररोज २.५ ते ३ लिटर पाणी पिण्याची आवश्यकता असते. पण, हे प्रमाण तुमच्या शरीराचे वजन, शारीरिक हालचाली आणि हवामानावर अवलंबून असते. उन्हाळ्यात जास्त घाम येतो, त्यामुळे पाण्याची गरज जास्तसुद्धा भासू शकते.

उन्हाळ्यात पाणी पिण्याचे फायदे (Benefits Of Drinking Water )

शारीरिक क्षमता वाढविण्यास मदत होते : पाणी पिण्यामुळे शरीराला केवळ हायड्रेटेड ठेवता येत नाही तर दिवसभराच्या कामासाठी ऊर्जादेखील मिळते, ज्याच्या मदतीने तुम्ही दिवसभर चांगले काम करू शकता. जेव्हा शरीर पूर्णपणे हायड्रेटेड असते, तेव्हा शारीरिक हालचालीतदेखील सुधारणा होते.

बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते : जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर सर्वात आधी तुम्ही पुरेसे पाणी प्यावे. असे केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेंदूचे कार्य सुधारते : डिहायड्रेटड शरीर साधी कामेदेखील करू शकत नाही, कारण मेंदूवर हायड्रेशनचा मोठा परिणाम होतो. अभ्यासानुसार, थोडेसे डिहायड्रेशनदेखील मेंदूच्या कार्यावर परिणाम करू शकते.