फिटनेसच्या बाबतीत सजग असणारे अनेक जण त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देत असतात. त्यामुळे अशा व्यक्ती कायम त्यांच्या आहारात सकस आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करतात. तसंच ज्या व्यक्तींना वजन कमी करायचं आहे असे काही जणदेखील त्यांच्या आहारात पचायला हलके आणि पटकन पोट भरेल अशा पदार्थांचं सेवन करताना दिसतात. त्यामुळे अनेकांची ओट्स या पदार्थाला विशेष पसंती असते. परंतु, ओट्स केवळ पोटभरीचंच काम करतात असं नाही, तर त्याचे अनेक गुणकारी फायदेदेखील आहेत. ते जाणून घेऊयात.
१.कच्चे ओट्स खाल्यास वजन लवकर कमी होण्यास मदत मिळते.
२. ओट्समुळे पोट पटकन भरते.
३. ओट्समुळे शरीरातील ब्लड कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो.
४. पचनक्रिया सुधारते.
५. रक्तदाब नियंत्रणात राहतो.
६. हृदयाशी निगडीत आजार होण्याची शक्यता कमी असते.