Natural Hair Oils For Indian Hair : टाळूच्या मालिशपासून ते केसांना खोलपर्यंत पोषण देण्यापर्यंत पिढ्यानपिढ्या तेलाचा वापर केला जातो. तेल लावल्यामुळे केस दाट तर होतातच आणि केसांना चमकसुद्धा येते. त्यामुळे सहसा आपण केस धुण्याआधी नारळ किंवा बदाम तेलाचा वापर करतो. दोन्हीही तेल त्यांच्या वेगवेगळ्या फायद्यांसाठी प्रसिद्ध आहेत. पण, जेव्हा केसांचा विचार केला जातो, तेव्हा नेमके कोणते तेल निवडायचे हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो; तर आज आपण या बातमीतून तेच जाणून घेण्याचा प्रयत्न करूया…
केसांना फक्त तेल लावणे पुरेसे नाही. केसांच्या टेक्स्चरनुसार योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने तेल लावल्यास त्याचा फायदा होतो.
भारतातील लोकांच्या केसांसाठी कोणते तेल बेस्ट आहे?
नारळ तेल चांगले का आहे?
१. लॉरिक ॲसिडचे प्रमाण जास्त असल्याने नारळ तेल केसांच्या खोलवर जाते, ज्यामुळे प्रथिनांचे नुकसान कमी होते आणि आतून व बाहेरून केस मजबूत होतात.
२. नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म टाळू स्वच्छ राहण्यास मदत करतात आणि कोंडा होण्यापासून केसांचे संरक्षण करतात.
३. दररोज नारळाचे तेल वापरल्याने प्रदूषण, सूर्यप्रकाश आणि स्ट्रॉंग शॅम्पूपासून केसांचे रक्षण होते.
कोणी आणि कसे लावावे नारळ तेल?
१. ज्यांचे केस जाड, खरखरीत किंवा कुरळे असतात, त्यांच्या केसांना जास्त ओलावा लागतो.
२. केसांना मजबूत करण्यासाठी आणि केसांचे फाटे फुटण्यासाठी थांबण्यासाठी तुम्ही नारळ तेल लावू शकता.
३. गरम तेलाचे उपचार आणि रात्रीचे खोल कंडिशनिंग.
बदाम तेल तुमच्या केसांसाठी कसे काम करतात?
व्हिटॅमिन ई, ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि मॅग्नेशियमच्या समृद्धतेमुळे बदाम तेल टाळूला पोषण देते आणि केसांची लवचिकता वाढवते. बदाम तेल हलके असते आणि त्यामुळे नारळाच्या तेलापेक्षा बदामाचे तेल केस धुतल्यानंतर लगेच निघून येते, ज्यामुळे केसांवरील चिकटपणा नाहीसा होतो आणि रोज वापरामुळे चमक आणि लवकर पांढरे केस कमी होण्यास मदत होते.
बदाम तेल कोणत्या केसांसाठी निवडावे?
- सरळ केस, ज्यांना हलक्या ओलाव्याची आवश्यकता असते त्यांनी बदामाचे तेल लावावे.
- बदामाचे तेल लावल्याने ओलसर वातावरणात केसांची कोंडी कमी होते.
- रक्तप्रवाह वाढविण्यासाठी, टाळूची मालिश करण्यासाठी बदामाच्या तेलाचा वापर करावा.
नारळाचे किंवा बदामाचे कोणते तेल तुम्ही वापरले पाहिजे?
१. बघायला गेलं तर याचं एकच उत्तर देता येणार नाही. जर तुमचे केस कोरडे, जाड असतील तर नारळ तेल अधिक प्रभावी ठरू शकते.
२. हलके आणि चिकट नसणारे तेल तुमच्या केसांना चमक आणि गुळगुळीतपणा प्रदान करतो. त्यासाठी बदाम तेल हा एकच मार्ग आहे. बहुतेक लोक दोन्ही तेल वापरतात, त्यामुळे आठवड्यातून एकदा कंडिशनिंगसाठी नारळ तेल आणि दररोज स्कॅल्प मसाजसाठी बदाम तेल योग्य ठरेल.
३. भारतीय केसांसाठी नारळ तेल दुरुस्ती आणि संरक्षणाचे काम करते, तर बदाम तेल केसांना गुळगुळीत आणि मॉइश्चरायझ करते.
त्यामुळे कोणते तेल निवडायचा हा निर्णय तुमच्या केसांचा प्रकार, हवामान आणि पसंतींवर अवलंबून आहे. जर तुम्ही यापैकी एक निवडले किंवा दोन्ही एकत्र केले तर हे नैसर्गिक तेल मजबूत, चमकदार आणि निरोगी केस ठेवण्यासाठी तुमची मदत होते .