Best Drink for Kidney Health: आपल्या शरीरातील किडनी म्हणजे नैसर्गिक शुद्धीकरणाचं काम करीत असते. पण एकदा का या फिल्टरमध्ये घाण, युरिक अॅसिड किंवा टाकाऊ द्रव्यं जमा होऊ लागली, की किडनीची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागते आणि हीच गोष्ट आयुष्यात धोका निर्माण करू शकते. तुम्हाला माहीत आहे का की, अगदी किरकोळ लक्षणांकडेही दुर्लक्ष केल्यास ही समस्या किती मोठ्या संकटाला आमंत्रण देऊ शकते?
तज्ज्ञ सांगतात, जेव्हा युरिक अॅसिड किडनीत खड्यांच्या रूपानं साचायला लागतं, तेव्हा शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर जाण्याऐवजी रक्तामध्येच फिरू लागतात. परिणामी शरीरात विषारी द्रव्यं वाढतात आणि हळूहळू थकवा, पोट फुगणं, भूक मंदावणं, झोप न लागणं अशी अनेक त्रासदायक लक्षणं दिसू लागतात. इतकंच नाही, तर काही वेळा पायांना सूज, मसल क्रॅम्प्स, छातीत दुखणं आणि श्वास घ्यायला त्राससुद्धा सुरू होऊ शकतो. या सगळ्यामुळे प्रश्न पडतो किडनीला नेहमी तंदुरुस्त ठेवण्यासाठी उपाय काय?
उत्तर लपलेलं आहे आपल्या स्वयंपाकघरातच. आहारतज्ज्ञ ख्याती रूपानी यांनी या संदर्भात नुकतंच एक सोपं, पण प्रभावी डिटॉक्स ड्रिंक सांगितलं आहे, जे किडनीतील घाण स्वच्छ करून शरीर हलकंफुलकं ठेवू शकतं. त्याची किंमत किती? फक्त २० रुपये.
कसं बनवायचं हे खास ड्रिंक?
एका ग्लास पाण्यात मूठभर हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून घाला. त्यात २-३ वेलदोडे टाका आणि हे मिश्रण पातेल्यात चांगलं उकळून घ्या. नंतर गाळणीनं गाळून त्याचा अर्क काढा. हे सुवासिक हिरवट पेय किडनी आणि लिव्हर डिटॉक्स करण्यास मदत करू शकते. आठवड्यातून किमान तीन वेळा, विशेषत: रात्री झोपण्यापूर्वी एक कप हे ड्रिंक पिण्याचा सल्ला दिला जातो.
कल्पना करा, अवघ्या २० रुपयांत तयार होणारं हे साधं पेय, किडनीतील युरिक अॅसिड लघवीवाटे बाहेर फेकण्यास मदत करतं. औषधांच्या वारेमाप खर्चाशिवाय शरीरातील नैसर्गिक फिल्टर स्वच्छ ठेवण्याची ही एक जबरदस्त संधी आहे.
परंतु, इशारा लक्षात ठेवा की, जर तुम्हाला सतत मळमळ, भूक मंदावणे, वारंवार लघवी लागणं किंवा पाय-घोट्याला सूज येणं अशी लक्षणं दिसली, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण- डिटॉक्स ड्रिंक कितीही प्रभावी असलं तरी ते वैद्यकीय उपचाराला पर्याय ठरू शकत नाही.
येथे पाहा व्हिडीओ
आता निर्णय तुमचाच किडनीला वेळेवर डिटॉक्स करून निरोगी ठेवणार की लक्षणांकडे दुर्लक्ष करून आजार वाढवणार?
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)