कार्यालयात किंवा घरात खुर्चीवर बसून करता येण्याजोगा हा व्यायाम आहे. खांद्याचे स्नायू बळकट करण्यासाठी या व्यायामाचा उपयोग होतो. हा व्यायाम करण्यासाठी योग्य वजन असलेली पाण्याची बाटली आवश्य? ???.

छायाचित्र १ आणि २

mumbai high court evm purchase marathi news
“न्यायालय टपाल खाते आहे का ?”, मतदान यंत्र खरेदीसंदर्भातील याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाचे याचिकाकर्त्याला खडेबोल
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान

खुर्चीवर ताठ बसा. दोन्ही हातात पाण्याच्या दोन बाटल्या घ्या. या बाटल्या अर्ध्या  भरलेल्या असाव्यात. दोन्ही हात कोपरात दुमडून वरच्या दिशेने काटकोनात धरा. मग ते डोक्यावर आणत एकमेकांना भिडवा. पुन्हा पहिल्या स्थितीत हात आणा आणि मग पुन्हा डोक्यावर न्या. असे किमान १० वेळा करा. काही दिवसांनी संख्या वाढवली तरी चालेल.

छायाचित्र ३ आणि ४

खुर्चीवर ताठ बसा. दोन्ही हातात पाण्याच्या बाटल्या घेतल्यानंतर खाली वाकून मांडीखाली दोन्ही बाटल्यांचा एकमेकांना स्पर्श करा. पुन्हा या बाटल्या वर करून आधीच्या स्थितीत या. असे किमान १० वेळा करा. काही दिवसांनी १० पेक्षा जास्त वेळाही हा व्यायाम करू शकता. या व्यायामाला ‘बेंट ओव्हर लॅटरल राइज’ असे म्हणतात. या व्यायामाने खांद्यांच्या मागच्या बाजूस असलेल्या स्नायूंना बळकटी येते.

डॉ. अभिजीत जोशी dr.abhijit@gmail.com