Six Drinks To Remove Fat From Liver: लिव्हर हा शरीरातील एक अति महत्त्वाचा अवयव आहे. लिव्हर अन्न पचवणे, पोषक तत्त्वे साठवणे, विषारी पदार्थ काढून टाकणे आणि रोगप्रतिकारक शक्तीला आधार देणे अशा अनेक शारीरिक कार्यांमध्ये भूमिका बजावते. असं असताना काही परिस्थिती केवळ लिव्हरच्या कार्यावर परिणाम करत नाहीत, तर लिव्हर निकामी होण्याचा धोकादेखील वाढवतात. फॅटी लिव्हर सर्वात सामान्य लिव्हरच्या आजारांपैकी एक आहे. यामध्ये लिव्हरमधील जास्तीची चरबी जमा होते. अशी परिस्थिती जास्त मद्यपान, लठ्ठपणा, डायबिटीज, उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब यासारख्या गोष्टींमुळे होऊ शकते. फॅटी लिव्हर असलेल्या बहुतेक लोकांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, म्हणूनच त्याचे निदान अनेकदा उशिरा होते.
फॅटी लिव्हरच्या समस्येवर औषधे आणि काही जीवनशैलीतील बदल अशाप्रकारे उपचार केले जाऊ शकतात. आहार लिव्हरमध्ये जमा झालेली अतिरिक्त चरबी विरघळवण्यात देखील मदत करू शकतो. प्रसिद्ध डॉक्टर एरिक बर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशी सहा शक्तिशाली ज्यूस आहेत ज्यांचा समावेश तुमच्या आहारात केल्यास फॅटी लिव्हरपासून मुक्त होण्यास मदत मिळू शकते.
बीटाचा रस
बीटरूटच्या रसाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ते नायट्रिक ऑक्साईड वाढवते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. ते जळजळ कमी करण्यासही मदत करू शकते. बीटरूटमध्ये बेटेन भरपूर प्रमाणात असते. हे एक नैसर्गिक आहे जे लिव्हरमधील रसायनांना विषमुक्त करण्यास मदत करते. बीटरूटच्या रसात ग्लूटाथिओन देखील जास्त प्रमाणात असते, ते लिव्हरची विषमुक्ती क्षमता वाढवते.
लिंबू आणि अॅपल सायडर व्हिनेगर
लिंबू आणि अॅपल सायडर व्हिनेगर मिसळून एक ग्लास पाणी पिऊ शकता. लिंबू शरीरातील पित्त क्षार वाढवण्यास मदत करू शकते. ते प्रत्यक्षात लिव्हरला अतिरिक्त कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करते. दरम्यान, अॅपल सायडर व्हिनेगर इन्सुलिन संवेदनशीलतेला समर्थन देते, जे रक्तातील साखर नियंत्रणासाठी फायदेशीर आहे.
डेंडिलियन रूट
पिवळ्या रंगाची फुलं येणारे रानटी फुलझाड हे लिव्हरसाठी एक शक्तिशाली टॉनिक आहे. ही कडू भाजी लिव्हरसाठी खूप फायदेशीर मानली जाते. कारण ती पित्त उत्पादन वाढवण्यास मदत करते आणि लिव्हरमधील चरबी काढून टाकण्यास मदत करते. पिवळ्या रंगाची फुलं येणारं हे फुलझाड अतिरिक्त द्रवपदार्थ काढू टाकण्यासाठी मूत्रवर्धक म्हणून देखील काम करू शकते. हे पाण्यात उकळून पिल्यास याचा फायदा होतो.
ग्रीन टी
फॅटी लिव्हरच्या समस्या दूर करण्यासाठी ग्रीन टी देखील एक फायदेशीर पेय आहे. कारण ग्रीन टी लिव्हरमधील एन्झाइम्स ALT आणि AST कमी करण्यास मदत करते. जेव्हा हे एन्झाइम्स वाढतात तेव्हा ते तुमच्या लिव्हरवरील ताण वाढल्याचे सांगतात. ग्रीन टी मध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करणारे गुणधर्मदेखील असतात. म्हणून दररोज ग्रीन टी पिणे खूप फायदेशीर ठरू शकते.
हळदीचा चहा किंवा दूध
फॅटी लिव्हरच्या समस्येवर आणखी एक पेय म्हणजे हळदीचा चहा किंवा दूध. तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे, हळद ही सर्वात शक्तिशाली दाहक विरोधी पदार्थांपैकी एक आहे, ज्याचे तुम्ही सेवन करू शकता. हे लिव्हरसाठी फायदेशीर आहे.
बोन ब्रॉथ
जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुमच्या आहारात तुम्ही हाडांच्या सूपचा समावेश करू शकता. हाडांच्या सूपमध्ये ग्लायसीन आणि प्रोलाइन नावाचे दोन अमिने आम्ल जास्त असतात, जे प्रत्यक्षात तुमच्या लिव्हरला आधार देतात आणि पोषण देतात.
