अंडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, म्हणूनच प्रौढ आणि मुलांच्या आहारात अंड्यांचा समावेश करण्याची शिफारस आरोग्य तज्ज्ञ करतात. विशेषत: हिवाळ्यात लोक अंडी जास्त खातात. ते तुमचे शरीर उबदार ठेवतात आणि तुम्हाला पोषण देते, याशिवाय लोकांना अंड्याची चवही खूप आवडते. जर तुम्हाला देखील अंडी खायला आवडत असेल तर हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे

इतर गोष्टींप्रमाणे अंडी देखील खराब होतात. अशा स्थितीत इतर खाद्यपदार्थांप्रमाणेच त्यांचीही योग्य प्रकारे साठवणूक करणे अत्यंत आवश्यक ठरते. तुम्हाला अंडी खराब होणे टाळण्यासाठी साठवण्याची एक खास युक्ती सांगत आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही अंडी दीर्घकाळ ताजी ठेवू शकता.

अंडी साठवण्याचा योग्य मार्ग कोणता आहे?

प्रसिद्ध शेफ रणवीर ब्रारने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शेफ ब्रार सांगतात की, ‘लोक बाजारातून अंडी आणतात आणि कसेही जमध्ये ठेवतात. परंतु त्यांना दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी अंडी योग्य स्थितीत ठेवणे फार महत्वाचे आहे.

शेफच्या मते, ‘जर तुम्हाला अंडी जास्त काळ ताजी ठेवायची असतील तर अंड्याचानि निमुळते टोक वर आणि रुंद भाग अंड्याच्या ट्रेमध्ये ठेवा.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे करणे का आवश्यक आहे?

या प्रश्नाचे उत्तर देताना, इंडियन एक्स्प्रेसशी विशेष संवाद साधताना, सल्लागार आहारतज्ज्ञ आणि मधुमेह शिक्षक कनिका मल्होत्रा ​​यांनी सांगितले, ‘अंड्यांचे निमुळते टोक खाली आणि रुंद टोकाला वर ठेवल्याने ते अधिक काळ ताजे राहतात. कारण अंड्याच्या रुंद टोकाला एअर सेल असते. आता अंडे जुने होत जातेते तसतसे ही एयर सेल देखील हळूहळू मोठी होऊ लागते. परंतु जेव्हा तुम्ही अंड्याचे रुंद टोक वरच्या बाजूला ठेवता तेव्हा या एयर सेलच्या वाढीचा वेग मंदावतो, म्हणजेच असे केल्याने एयर सेलचा खूप वेगाने विस्तार होण्यापासून रोखले जाते. यामुळे अंड्यातील नैसर्गिक ओलावा कायम राहून ते लवकर खराब होत नाही.

या गोष्टीही लक्षात ठेवा

  • या टीप व्यतिरिक्त, कनिका मल्होत्रा ​​अंडी लवकर खराब होणे टाळण्यासाठी रेफ्रिजरेटरचे तापमान ४०°F (4°C) किंवा त्यापेक्षा कमी ठेवण्याची शिफारस करतात. यामुळे अंड्यांमध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका कमी होतो.
  • अंडी साठवताना आधी जुनी अंडी वापरा आणि नवीन अंडी रेफ्रिजरेटरच्या मागे ठेवा.
  • कनिका मल्होत्राच्या म्हणण्यानुसार, तुम्ही अंडी कितीही चांगल्या प्रकारे साठवून ठेवत असाल तरी ते बाजारातून आणल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत वापरा.
  • या सर्वांशिवाय, असामान्य वास, रंग बदलणे किंवा खराब पोत यांसारख्या खराब होण्याच्या कोणत्याही लक्षणांसाठी अंडी वेळोवेळी तपासा. अशा वेळी ही अंडी खाणे टाळावे.