Bhel Puri : भेळपुरी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. अनेकदा आपण बाहेरची भेळपुरी आवडीने खातो पण बाहेर अस्वच्छता असल्यामुळे आजारी पडण्याचा धोका असतो. अशावेळी घरच्या घरी भेळपुरी बनवणे, अधिक सोयीस्कर असते. आज आम्ही तुम्हाला स्वादिष्ट भेळपुरी कशी बनवायची, हे सांगणार आहोत.
साहित्य
- मुरमुरे
- शेंगदाणे
- कांदा
- हिरवी मिरची
- टोमॅटो
- बारीक शेव
- कोथिंबीर
- चाट मसाला
- गोड चटणी
- लाल तिखट
- मीठ
हेही वाचा : कुरकुरीत मंच्युरियन घरी कसे बनवावे? जाणून घ्या ही सोपी रेसिपी
कृती
- सुरुवातीला शेंगदाणे भाजून घ्या
- एका भांड्यात मुरमुरे घ्या.
- त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, आणि टोमॅटो टाका.
- त्यात चाट मसाला, लाल तिखट, गोड चटणी आणि चवीनुसार मीठ टाका.
- त्यानंतर भाजलेले शेंगदाणे आणि त्यात बारीक शेव टाका.
- सर्व मिश्रण एकत्र करा.
- तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात फरसाण टाकू शकता.
- बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावर टाकून सर्व्ह करा.