बर्‍याचदा आपल्याला बाइक एका शहरातून दुसऱ्या शहरात न्यायची असते; पण अनेकदा अंतर फार असल्याने ती रस्त्याने चालवत नेणे शक्य होत नाही. अशा वेळी आपण खासगी पार्सल कंपनीची मदत घेतो; पण त्यासाठी हजारो रुपये खर्च करावा लागतो. मात्र, भारतीय रेल्वेच्या माध्यमातून तुम्ही हेच काम अगदी कमी पैशात सहज करू शकता. त्यासाठी रेल्वे तुम्हाला एक सुविधाही देते; ज्यामध्ये तुम्ही तुमची बाइक सामान किंवा पार्सलच्या स्वरूपात एका शहरातून दुसऱ्या शहरात ट्रान्स्पोर्ट करू शकता. यामध्ये सामानाचा अर्थ असा आहे की, तुम्ही ज्या ट्रेनमधून प्रवास करीत आहात, त्याच ट्रेनमधून बाइकही नेली जात आहे आणि पार्सल म्हणजे तुम्ही फक्त सामान इच्छित स्थळी पाठवीत (ट्रान्स्पोर्ट) आहात; पण तुम्ही त्या ट्रेनमधून प्रवास करीत नाहीत. ट्रेनमधून बाइक पार्सल करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धत काय आहे आणि त्यासाठी तुम्हाला किती खर्च करावा लागेल ते जाणून घेऊ.

ऑफलाइन बुकिंग प्रक्रिया

१) पार्सल बुकिंग स्टेशनवर जा.

२) बुकिंग फॉर्म मॅन्युअली भरा.

३) पार्सलसह रीतसर भरलेली फॉरवर्डिंग नोट सबमिट करा.

४) यावेळी पार्सलचे म्हणजे तुमच्या सामानाचे वजन केले जाईल आणि बुकिंग काउंटरवर माल वाहतूक शुल्क प्रत्यक्षात वजनानुसार घेतले जाईल.

५) आता मालवाहतूक शुल्क जमा करा आणि रेल्वे पावती (RR) घ्या.

sarkari naukri nhpc recruitment 2024
NHPC Recruitment 2024 :कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा सरकारी नोकरी; ‘या’ पदांसाठी भरती सुरू; ३० एप्रिलपूर्वी करा अर्ज
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
Wrist ticket, Metro 1, Mumbai,
मुंबई : ‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकीट सेवा कार्यान्वित
Mumbai Metro Introduces Wristband Ticketing for Metro 1 Route No Need for Paper or Mobile Tickets
‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी आता मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकिट सेवा कार्यान्वित

६) मूळ ‘रेल्वे पावती’ घेतल्यानंतर आता ते पार्सल तुमच्या गंतव्य स्थानकावरून म्हणजे जेथे तुम्हाला पाठवायचेय तेथील स्थानकावरून घ्या.

हेही वाचा – फिरायला जाण्यासाठी हॉटेल रूम बुक करताय? मग जरा थांबा, आधी ‘हा’ VIDEO पाहा, मग करा बुकिंग

ऑनलाइन बुकिंग प्रक्रिया

१) http://www.parcel.indianrail.gov.in वेबसाईटवर जा.

२) रजिस्टर करा आणि पोर्टलवर लॉग इन करा.

३) ऑनलाइन फॉर्ममध्ये मूळ (तुम्ही जेथून पाठवताय) स्थानक आणि गंतव्य स्थानक नमूद करा.

४) सिस्टीमने सुचवलेल्या ट्रेनच्या सूचीमधून तुम्हाला हवी ती ट्रेन (ट्रेनचे नाव वा क्रमांक) निवडा.

५) आता बुकिंग फॉर्म भरा.

६) आता तुमच्या पार्सलचे वजन जनरेट करत सिस्टम अंदाजे मालवाहतूक शुल्क आकारेल.

७) सिस्टीमने जनरेट केलेली ई-फॉरवर्डिंग नोट तयार केलेली नोट रेल्वेच्या वेअरहाऊसमध्ये जमा करा.
,
८) आता ई-फॉरवर्डिंग नोटच्या प्रिंटआउटसह पार्सल मूळ स्थानकाकडे घेऊन जा.

९) येथे पार्सलचे वजन केले जाईल आणि वास्तविक मालवाहतुकीचे शुल्क बुकिंग काउंटरवर सिस्टीमद्वारे ठरविले जाईल.

१०) आता आलेले मालवाहतूक शुल्क भरा आणि रेल्वे पावती (RR) घ्या.

११) ट्रॅक अॅण्ड ट्रेस सुविधा वापरून पार्सल कुठपर्यंत पोहोचलेय हे जाणून घेऊ शकता.

१२) जेव्हा पार्सल त्याच्या गंतव्य स्थानकावर पोहोचते तेव्हा ग्राहकाला एक सूचना वा एसएमएस प्राप्त होईल.

१३) आता मूळ रेल्वे पावती (आरआर) जमा) करा आणि तुमच्या इच्छित गंतव्य स्थानकावरील डिलिव्हरी काउंटरवरून तुमचे पार्सल ताब्यात घ्या.

रेल्वेने बाइक पाठवण्यासाठी किती रुपये खर्च येतो?

रेल्वेने बाइक पाठवण्याचे भाडे त्याचे वजन आणि अंतरानुसार मोजले जाते. पार्सलपेक्षा दुचाकी वाहतूक करण्यासाठी सामानाचे शुल्क जास्त आहे. ५०० किलोमीटर अंतरापर्यंत बाइक पाठवण्याचे सरासरी भाडे साधारणत: १२०० रुपये असते. मात्र, बाईकचे अंतर आणि वजन यानुसार फरक असू शकतो. याशिवाय बाइकच्या पॅकिंगसाठी ३०० ते ५०० रुपये खर्च येऊ शकतो.

बाइक पाठवण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

पार्सल किंवा सामान म्हणून बाइक नेण्यासाठीतुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, ज्या दिवशी तुम्हाला बाइक पाठवायची आहे त्या दिवशी किमान एक दिवस आधी बुकिंग करा. बुकिंगच्या वेळी, तुमच्यासोबत बाइकचे नोंदणी प्रमाणपत्र आणि विम्याची कागदपत्रे असली पाहिजेत. याशिवाय आधार, ड्रायव्हिंग लायसन्स यासारखी महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवा. बाईक पॅक करण्यापूर्वी पेट्रोल टाकी पूर्णपणे रिकामी करा. वाहनात पेट्रोल असल्यास १००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.