महीन्याभरापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात लॉन्च केल्यानंतर BlackBerry KEY2 स्मार्टफोन अखेर भारतातही लॉन्च करण्यात आला आहे. ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असलेला हा ब्लॅकबेरीचा पहिलाच स्मार्टफोन आहे. ब्लॅकबेरीने आपला मोबाइल बिजनेस यापूर्वीच बंद केला असून आता टीसीएल कंपनी ब्लॅकबेरीच्या फोनची निर्मीती करते.

4.5 इंच फूल एचडी डिस्प्ले असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 2.5D कॉर्निंग गोरिला ग्लास देण्यात आलाय. यामध्ये ऑक्टाकोर 64 बिट क्वॉल्कॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर आहे. यामध्ये 4GB रॅम असून इंटरनल मेमरी 64GB आहे. फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी यामध्ये 12 मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. कॅमेऱ्याला ऑटोफोकस फेस डिटेक्शन, ड्युअल टोन एलईडी आणि 4K व्हिडीओ रेकॉर्डिंगचा सपोर्ट आहे. सेल्फीप्रेमींसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

31 जुलैपासून अॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळावर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होईल. 42 हजार 990 रुपये इतकी BlackBerry KEY2 ची भारतात किंमत असेल. रिलायन्स जिओ आणि आयसीआयसीआय बँकेकडून या फोनसाठी कॅशबॅक ऑफर दिली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्पेसिफिकेशन –
डिस्प्ले – 4.50 इंच
प्रोसेसर – 2.2 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर
फ्रंट कॅमेरा – 8-मेगापिक्सल
रिझोल्यूशन – 1080×1620 पिक्सल
रॅम – 6 जीबी
ओएस – अॅन्ड्रॉइड 8.0 Oreo
स्टोरेज – 64 जीबी
रिअर कॅमेरा – 12-मेगापिक्सल
बॅटरी क्षमता – 3500 एमएएच