सहसा लोकं दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात. त्याशिवाय दिवसाची सुरुवात करणे अनेकांना अवघड जाते. तर आजकाल लोकं पूर्वीपेक्षा जास्त कॉफी किंवा चहा पिऊ लागले आहेत. पण जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेहाने त्रस्त असलेल्या व्यक्तीने काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत खूप काळजी घेतली पाहिजे.

मधुमेह असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करावा जे नैसर्गिकरित्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात. असे बरेच पदार्थ आहेत जे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात आणि मधुमेह नियंत्रित करणे अधिक कठीण बनवू शकतात. अनेक अभ्यासांमध्ये हे समोर आले आहे की एक कप कॉफी किंवा चहा प्यायल्याने तणाव आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. वजन कमी करण्यासही मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी कॉफी किंवा चहा सुरक्षित आहे की नाही हे जाणून घेऊया.

Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Solar rooftop electricity connection
सरकारने नियम बदलले, आता सौर पॅनल अन् वीज जोडणी तात्काळ मिळणार
Blood sugar control
बाजारात मिळणाऱ्या ब्रेड्सपैकी कोणते ब्रेड्स खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येईल? तज्ज्ञांचा सल्ला वाचा
Benefits of cuddling for health
हृदयाच्या आरोग्यापासून ते उत्तम झोपेपर्यंत ‘Cuddling’, ‘मिठी मारणे’ ठरते फायदेशीर! काय सांगतात डॉक्टर पाहा…

अमेरिकेतील संशोधनानुसार कॉफी पिणाऱ्यांमध्ये टाइप २ मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. तुम्हाला आधीच मधुमेह असल्यास, त्याचे परिणाम व्यक्तीपरत्वे वेगवेगळे असू शकतात. काहींचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो तर काहींना रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

दुसरीकडे, हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी, मधुमेहाने ग्रस्त व्यक्ती रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणार नाही, असा विचार करून फिकट चहा पीत आहे, तर तो चुकीचा विचार करत आहे. चहामध्ये दूध आणि इतर घटक जोडल्यास त्याच्या रक्तातील साखरेची पातळी वाढेल. जेवणानंतर लगेच चहा-कॉफी प्यायल्याने लोहाच्या प्रमाणावर कॅफिनचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे लोह शोषले जात नाही आणि हिमोग्लोबिन कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत आपल्या मनात योग्य प्रश्न येतो की कोणता चहा आपल्या आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर आहे?

तज्ञांच्यानुसार पाणी पिण्यापेक्षा दिवसातून तीन ते चार कप चहा पिणे हा एक चांगला पर्याय आहे, कारण चहा शरीराला अँटीऑक्सिडेंट प्रदान करते जे आपल्या पेशींमधून मुक्त रॅडिकल्स काढून टाकतात आणि ऑक्सिडेशनमुळे होणारे नुकसान टाळतात. या प्रकरणात, आपण आले, लिंबू, वेलची आणि मसाला चाय प्यावे. नावाप्रमाणेच, या चहामध्ये वेलची, आले, दालचिनी आणि काळी मिरी यांच्यासह विविध भारतीय मसाले आणि औषधी वनस्पती मिसळल्या जातात.