scorecardresearch

स्तनपान करणाऱ्या मातांनी ‘या’ पदार्थांचं सेवन करणं पूर्णपणे टाळावं

स्तनपानावेळी शरीरातून निघणाऱ्या ऑक्सिटॉक्सिन हार्मोनमुळे बाळाचं आरोग्य सुधारतं.

breastfeeding- take-care-tips
(संग्रिहत फोटो)स्तनपान करणाऱ्य़ा मातांनी योग्य आहार करणं गरजेचं आहे.

नवजात बालकांसाठी आईचं दूध हे अमृतसमान असतं. आपल्या बाळाला निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येक मातेने स्तनपान करणं गरजेचं आहे. स्तनपानावेळी शरीरातून निघणाऱ्या ऑक्सिटॉक्सिन हार्मोनमुळे बाळाचं आरोग्य सुधारतं शिवाय आई आणि बाळातील जिव्हाळ्याची भावना वाढण्यास मदत होते. त्यामुळेच स्तपानाच्या काळात मातांनी आहारावर लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. तज्ञांच्या आभ्यासानुसार काही पदार्थ असे आहेत जे स्तनपाताच्या काळात टाळणं अत्यंत गरजेचं आहे.

 गहू: गव्हामध्ये आढळणार ग्लुटन नावाचं प्रोटीन बाळासाठी हानीकारक ठरू शकतं. त्यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांनी गव्हाच्या पदार्थांचा आहारात कमी प्रमाणात समावेश करावा. गव्हाच्या पदार्थांचं सेवन केल्याने बाळाच्या पोटात दुखू शकतं तसचं बाळ चिडचिड करू शकतं.

आंबट फळ: स्तनपान करणाऱ्या महिलांनी आंबट फळांचं सेवन करणं प्रकर्षाने टाळावं. विटामिन सी असलेल्या पदार्थांच स्तनपास करणाऱ्या महिलांनी सेवन केल्यास दूधात आम्लाचं प्रमाण वाढत. दूधासोबत ते बाळाच्या पोटात गेल्यास त्याला अपचन, पोटदूखीचा त्रास होवू शकतो.

 लसूण: लसणाच्या सेनवाचा स्तनपान करणाऱ्या महिलेवर काही दुष्परिणाम होत नसला तरी लसणाच्या वासामुळे काही समस्या निर्माण होवू शकतात. जर मातेने आहारात लसणाचा समावेश जास्त केला तर त्याचा गंध दूधात मिसळू शकतो. त्यामुळे बाळ दूध पिणं टाळू शकतं. दूध पिण्यावेळी दूधाचा वास आल्याने बाळ चिडचिड किंवा रडू शकतं.

कोबी: कोबीच्या सेवनामुळे मातेच्या शरीराक गॅस निर्माण होऊन छातीत जळजळ होवू शकते. याशिवाय बाळाला देखील अपचनासारख्या समस्यांचा त्रास होवू शकतो. यासोबतच मुळा, राजमा, ढोले, बटाटा, शेंगदाणे या पदार्थांच्या सेवनामुळे गॅसची समस्या निर्माण होवू शकते.

 कॉफी: कॉफीमध्ये कॅफेनचं प्रमाण मोठ्या प्रमणात असल्याने स्तनपान करणाऱ्या मातांनी कॉफीचं सेवन टाळावं. कॉफीच्या सेवनामुळे बाळाचं पोट बिघडू शकतं आणि ते चिडचिड करू शकतं. तसंच बाळाच्या प्रकृतीसाठी कॉफीसोबतच डार्क चॉकलेचं सेवन टाळावं.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-06-2021 at 21:39 IST
ताज्या बातम्या