Kitchen Jugaad Video:  झाडू ही एक अशी वस्तू आहे, जी प्रत्येकाचा घरात असतेच. घराच्या स्वच्छतेसाठी झाडूचा वापर केला जातो. झाडूशिवाय घरातील साफसफाई पूर्ण होऊच शकत नाही. संपूर्ण घराची साफसफाई एकट्या झाडूने केली जाऊ शकते. पण जेव्हा आपण नवीन झाडू विकत आणण्याचा विचार करतो, तेव्हा सर्वात पहिलं आठवतो तो झाडूतील भुसा. नवीन झाडूमधून प्रचंड भुसा निघतो. झाडू मारताना तो भुसा घरभर पसरतो. त्या भुशामुळे घरात आणखी कचरा होतो. केर काढताना कचऱ्यापेक्षा त्यामधील भुसाच जास्त खाली पडतो. अशा वेळी झाडूतील भुसा कसा काढायचा हा प्रश्न अनेक महिलांना सतावत असतो. दरम्यान, एका गृहिणीने खास महिलांसाठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

दरवाजाचं कुलूप तुमच्या घरातील झाडूला लावून पाहा- विचित्र आहे; पण असाच जुगाड व्हायरल व्हिडीओतील महिलेने दाखवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही कधी झाडूला कुलूप लावलं आहे का? नाही ना.. मग एकदा झाडूला कुलूप लावून बघा. हा जुगाड तुमच्या दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांवर मात करील. झाडूला कुलूप लावल्यानंतर झालेले बदल पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. एका गृहिणीने या जुगाडाचा शोध लावला असून, या अनोख्या जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाहूया महिलेनं नेमकं काय केलं आहे.

तुम्हाला नेमकं काय करायचं?

महिलेने व्हिडीओमध्ये सांगितल्यानुसार, सर्वप्रथम तुम्हाला काॅटनची मोठी बॅग घ्यायचा आहे. ज्यात तुम्हाला झाडू घालता येईल. झाडूचा जो खालचा झुपकेदार भाग असतो, तो काॅटनच्या बॅगमध्ये पूर्ण घाला. झाडू घातल्यानंतर त्यानंतर एक कुलूप घेऊन त्यावर हलक्या हाताने वरून टॅप करायचं आहे, असं महिलेने सांगितलं आहे. म्हणजे हळुवारपणे तुम्हाला कुलूप कॉटन बॅगला घासायचं आहे, ज्यात झाडू ठेवला आहे. थोड्या वेळानं काॅटनच्या पिशवीतून झाडू बाहेर काढा आणि तुम्हाला या पिशवीमध्ये झाडूचा भुसा पडलेला दिसेल. त्यामुळे तुमची सर्वांत मोठी समस्या सुटेल, असं महिलेचं म्हणणं आहे. हा प्रयोग तुम्हीदेखील करून पाहा…

Seema Family Vlog या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करून पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करून कळवा.

येथे पाहा व्हिडीओ

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करीत नाही.)