Suzuki ने बीएस-6 मानकांसह Access 125 स्कुटर सादर केली आहे. बीएस-6 इंजिन असलेली ही कंपनीची पहिलीच स्कुटर आहे. BS6 Suzuki Access 125 मध्ये फ्युअल इंजेक्शन-सिस्टिम आहे. याशिवाय सुझुकीने स्कुटरमध्ये काही नवे फीचर्सचाही समावेश केला आहे. किंमतीबाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही, जानेवारी महिन्यात लाँचिंगच्या वेळीच किंमतीचीही घोषणा केली जाईल.

बीएस-6 सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये एक्सटर्नल फ्युअल फिलर कॅप, नवीन एलईडी हेडलॅम्प आणि स्पीडोमीटरवर ईको लाइट यांसारखे फीचर्स आहेत. यातील डिजिटल स्क्रीनवर आता बॅटरी लाईफबाबत अपडेट मिळतील असं कंपनीने सांगितलं. याशिवाय नव्या सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये लांब सीट, सीटखाली स्टोरेजसाठी अधिक जागा, मोठा फ्लोरबोर्ड, ईजी स्टार्ट सिस्टिम, मोबाइल चार्जिंगसाठी युएसबी कनेक्टिव्हिटी यांसारखे फीचर्सही आहेत.

Grill coriander garlic fish recipe in marathi
ग्रिल्ड कोरिएन्डर गार्लिक फिश; असा बनवा कुरकुरीत मसाला फिश फ्राय
Swiggy delivery boy was caught on cctv camera stealing shoes kept outside flat in Gurugram video goes viral
VIDEO : डिलीव्हरी बॉयने चोरले घराबाहेरील शूज, घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद, पाहा व्हिडीओ
sensex today
Sensex Today: बाजार उघडताच सेन्सेक्सची उसळी; गाठला ऐतिहासिक उच्चांक!
Airtel Xtreme
लाईट्स, कॅमेरा, XStream : तुमचं वन स्टॉप एन्टरटेन्मेंट हब

आणखी वाचा – किंमत 45 हजार, रेंज 65 KM; आली नवीन ई-स्कुटर

इंजिन
अ‍ॅक्सेस स्कुटरमध्ये बीएस-6 मानकांसह 124 cc, सिंगल-सिलिंडर, एअर-कुल्ड इंजिन असून हे इंजिन 8.7ps ची ऊर्जा आणि 10 Nm टॉर्क निर्माण करतं.