BSNL कंपनीचा धमाकेदार प्लॅन, काय असेल ऑफर? जाणून घ्या

BSNL कंपनीने ग्राहकांसाठी धमाकेदार प्लॅन उपलब्ध केला आहे. ज्यामध्ये ग्राहकांना १२० दिवसांची वैधता असलेल्या ६६६ रुपयांच्या प्लॅनमध्ये २४० जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

lifestyle
BSNL कंपनीने आता ग्राहकांसाठी ६६६ रूपयांचा धमाकेदार प्लॅन उपलब्ध केला आहे. (photo: financial express)

टेलिकॉम कंपन्या आता दररोज त्यांच्या ग्राहकांसाठी नव-नवीन प्लॅन्स बाजारात आणत आहेत. या प्लॅन्समधून ग्राहकांना भरपूर डेटा, कॉलिंग आणि OTT अ‍ॅप्ससह अनेक सुविधा दिल्या जात आहेत. आता BSNL कंपनीने सुद्धा ग्राहकांसाठी असाच एक धमाकेदार प्लॅन उपलब्ध केला आहे. ज्यामध्ये कंपनीने ग्राहकांना डेटा आणि कॉलिंगचे अनेक फायदे दिले आहेत. चला तर मग जाणून घ्या BSNL च्या या नवीन प्लॅन बद्दल.

BSNL चा ६६६ रूपयांचा प्लॅन

BSNL कंपनीने आता ग्राहकांसाठी ६६६ रूपयांचा धमाकेदार प्लॅन उपलब्ध केला आहे. यामध्ये ग्राहकांना १२० दिवसांची वैधता देण्यात आली आहे. दरम्यान अजून पर्यंत कोणत्याही कंपनीकडून १२० दिवसांची वैधता असलेला प्लॅन ग्राहकांसाठी दिला नाहीये. एअरटेल (Airtel) आणि व्हीआय (VI) यांच्या बद्दल बोलायचे झाले तर या कंपन्या २८, ५६, ८४, १८० नंतर थेट ३६५ दिवसांपर्यंत वैधता असलेले प्लॅन ऑफर करत आहेत. BSNL ही एकमेव कंपनी आहे जी ९० आणि १२० दिवसांपर्यंत वैधतेचे प्लॅन देत आहे.

जाणून घ्या या प्लॅनचे फायदे

BSNL कंपनीने या प्लॅनमध्ये १२० दिवसांच्या वैधतेसह एका दिवसाला २ जीबी डेटा (2GB DATA) हा देण्यात आला आहे. या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना २४० जीबी डेटा मिळणार आहे. एवढेच नाही तर तुम्हाला या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगची सुविधा देखील देण्यात येणार आहे. याद्वारे ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड मोफत कॉल करू शकणार आहेत. याशिवाय BSNL च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १०० एसएमएस देखील उपलब्ध करण्यात आले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bsnl 666 rupees plan you can get 120 days validly 240gb data other benefits check details scsm

Next Story
स्वच्छ पाणी आणि साबणाने मुलांच्या चालनेत वाढ