‘कासपर्सस्की’च्या संसोधकांनी दिलेल्या माहितीनुसार या अॅप्लिकेशनच्या नवीन व्हर्जनमध्ये एक धोकादायक ट्रोजन ड्रॉपर मॉड्यूल अढळून आला. Trojan.Dropper.AndroidOS.Necro.n असे या ड्रॉपरचे नाव असल्याचे ‘कासपर्सस्की’ने म्हटले आहे. या ड्रॉपरमुळे हे अॅप्लिकेशन असणाऱ्या मोबाइलमध्ये युझर्सची कोणतीही परवानगी न घेता मालवेअर आपोआप इन्स्टॉल होतो. या मालवेअरचा वापर करुन मोबाइलमधील बँकेसंदर्भातील माहिती चोरण्यापासून ते खोट्या जाहिराती करण्यापर्यंत आणि खोट सबस्क्रायबर वाढवण्यापर्यंत अनेक गोष्टी केल्या जाण्याची शक्यता असले तसे ‘कासपर्सस्की’ने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. डेटा चोरी आणि युझर्सच्या न कळत माहिती मिळवण्याच्या उद्देशाने असे ड्रॉपर अॅप्लिकेशनचे नवीन व्हर्जन लॉन्च करताना त्यामध्ये टाकले जातात असं या ब्लॉगमध्ये नमूद करण्यात आले आहे.
‘कासपर्सस्की’ला याआधी चीनी फोनमधील काही अॅप्समध्ये हा मालवेअर अढळून आला होता. या फोनमध्ये हा मालवेअर प्रीइन्स्टॉल होता. गुगलकडे यासंदर्भात ‘कासपर्सस्की’ने माहिती कळवली असता युझर्सच्या डेटाला असणारा धोका लक्षात घेऊन गुगलने हे अॅप्लिकेशन आपल्या प्ले स्टोअरवरुन काढून टाकले आहे.
कॅमस्कॅनरने आपल्या अॅपमधून हा मालवेअर काढून टाकल्याचे स्पष्ट केले आहे. तरी वेगवेगळ्या मोबाइलवर या अॅपचे वेगवेगळे व्हर्जन उपलब्ध असल्याने त्यामध्ये हा मालवेअर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच हे अॅप इन्स्टॉल करणाऱ्या सर्व युझर्सने हे अॅप अनइन्स्टॉल करणे अधिक फायद्याचे ठरले. हे अॅप्लिकेशन १० कोटीहून अधिक युझर्सने डाऊनलोड केले होते.