सफरचंद हे सर्वात गुणकारी फळ मानले जाते. ‘अ‍ॅन अ‍ॅपल अ डे कीप्स डॉक्टर अवे’ अशी इंग्रजीमध्ये प्रसिध्द म्हण आहे. म्हणजेच रोज सफरचंद खाल्याने आपण निरोगी राहतो. कारण त्यात अनेक पोषक तत्व असतात. परंतु तुम्हाला माहित आहे का, सफरचंद खाल्ल्याने वजन वाढू शकते. चला तर जाणून घेऊया आरोग्यासाठी लाभदायक मानले जाणारे सफरचंद वजन वाढवण्यास कसे कारणीभूत ठरते.

आरोग्य तज्ञांच्या मते अति प्रमाणात सफरचंद खाल्ल्याने वजन वाढू शकते. तर योग्य प्रमाणात सफरचंद खाल्ल्यास ते आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. अनेक आरोग्य तज्ञांच्या मते सफरचंदामध्ये फ्रुक्टोजचे प्रमाण इतर फळांपेक्षा जास्त असते. ज्यामुळे वजन वाढू शकते. परंतु हे संशोधनातून सिद्ध झालेल नाही.

cried for coming late to school blamed mother
शाळेत उशीरा येण्याचं चिमुकल्यानं सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून पोट धरुन हसाल…
vvpat counting supreme court
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मतमोजणीबाबत सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस
this is a wedding card not aadhar card
आधार कार्ड नव्हे ही आहे लग्नाची पत्रिका! विश्वास बसत नसेल तर एकदा क्लिक करा अन् नीट बघा
devendra fadnavis and manoj jarange patil (1)
मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट, “देवेंद्र फडणवीसांनी पहाटे तीन वाजता फोन केला आणि..”

आणखी वाचा – आरोग्यवार्ता : नैसर्गिक आहाराद्वारे ‘हिमोग्लोबिन’ वाढ शक्य

सफरचंदामध्ये किती कॅलरी असतात?

सफरचंदाचे अनेक प्रकार आहेत. तसेच ते वेगवेगळ्या आकारात उपलब्ध असतात. एखाद्या सफरचंदामध्ये किती कॅलरी आहेत हे त्याच्या आकारावर अवलंबून असते. एखाद्या मध्यम आकाराच्या सफरचंदामध्ये ९५ कॅलरी असू शकतात. मोठ्या आकाराच्या सफरचंदामध्ये ११६ कॅलरी तर लहान आकाराच्या सफरचंदामध्ये ७७ कॅलरी असू शकतात.

सफरचंदामुळे वजन वाढते का?

रोजच्या जेवणासोबत जर तुम्ही दिवसभरात मध्यम आकाराचे ५ सफरचंद खाल्ले, तर कॅलरी एका दिवसात ५०० ने वाढू शकते. अशात जर तुम्ही रोज ५ सफरचंद खाल्ले तर दर आठवड्याला तुमच्या शरीरात ३,५०० अतिरिक्त कॅलरी जमा होतील. दरम्यान जर तुम्ही रोज सकाळी नाष्ट्यासोबत एक सफरचंद खाल्ले तर ते तुम्हाला निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरेल. यामुळे वजन कमी होऊ शकते, पण त्यासाठी इतर पदार्थांमधून मिळणाऱ्या कॅलरीज सुद्धा लक्षात घ्याव्या लागतील.

Health Tips : पाणी पिण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का? एक चूक ठरू शकते गंभीर आजारांचे कारण

सफरचंदातील फ्रुक्टोजमुळे वाढते वजन

सफरचंदाचे अति प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढू शकते. सफरचंदात फ्रुक्टोज असते, फळांमधील शर्करेचा हा मुख्य प्रकार आहे. फ्रुक्टोजयुक्त पदार्थ जास्त खाल्ल्याने वजन वाढण्यासोबतच मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल यांसारखे आजार उद्भवू शकतात. म्हणजेच अति प्रमाणात सफरचंद खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. परंतु दररोज १ सफरचंद खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. म्हणजेच योग्य प्रमाणात सेवन केल्याने सफरचंदाचे अनेक फायदे देखील आहेत. त्यामुळे याचे योग्य प्रमाण ठरवण्याआधी आरोग्य तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.