प्रवास करणे हा आयुष्याचा आनंद घेण्याचा अत्यंत रोमांचक मार्ग आहे. तुम्ही नवनवीन ठिकाणी भेट देता आणि नवनवीन अनुभव आपल्यासोबत घेऊ शकता. पण प्रवास करताना बऱ्याचदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेणे, अवेळी खाणे अशा अनेक गोष्टींमुळे आपली निरोगी जीवनशैली प्रवासादरम्यान मागे पडते. नवनवीन खाद्यपदार्थांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतोय याबाबत आपल्याला काहीही माहित नसते. अशावेळी स्वत:चे आरोग्य जपणे, निरोगी आणि तंदुरुस्त राहणे फार कठीण होऊ जाते. पण ज्यांना प्रवास करायला आवडते पण त्याचबरोबर निरोगी आणि तंदुरुस्त राहायला देखील आवडते, त्यांच्यासाठी सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजूता दिवेकर यांच्याकडे एक उपाय आहे. त्यांनी येथे ३ सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या फॉलो करून तुम्ही तंदुरुस्त देखील राहू शकता आणि प्रवासाचा आनंद देखील घेऊ शकता.

ऋजुता दिवेकर हिने अलिकडेच तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये, प्रवास करताना निरोगी राहण्याचे तीन सोपे मार्ग सांगितले आहेत.

चालणे : प्रवास करताना जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी कार किंवा बाईक ऐवजी चालत जा असे ऋजुता सांगते. आपण ते ठिकाण अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी चालले पाहिजे. ती सांगते , “जेव्हा मी प्रवास करत असते, तेव्हा मी फिरण्याची आणि स्थानिक संस्कृतीत जाणून घेण्याची संधी घेते. हे तुम्हाला ठिकाण तसेच उपलब्ध खाद्यपदार्थांची अधिक चांगली समज देते.” हे सामान्यपणे ज्ञात आहे की, प्रत्येक प्रदेशात काही स्थानिक खाद्यपदार्थ असतात जे हंगाम आणि भौगोलिक वातावरणाला अनुकूल असतात.

हेही वाचा – IRCTC ने आणले भन्नाट टूर पॅकेज! उन्हाळ्यात शिमला-कुल्लू-मनाली फिरण्याची संधी

व्यायाम : ऋजुता दररोज 5 सूर्यनमस्कार करण्याची शिफारस सर्वांना करते. हिमालयन योग संस्थेच्या मते, ”ही दिनचर्या तुमच्या पचनसंस्थेची कार्यक्षमता सुधारू शकते आणि तुमच्या आतड्यांमध्ये रक्त प्रवाह वाढवू शकते. सूर्यनमस्कार हा देखील एक प्रभावी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व्यायाम आहे जो जलद गतीने केल्यावर वजन कमी करण्यात मदत करतो, तसेच स्नायू, अस्थिबंधन, सांधे आणि कंकाल प्रणाली स्ट्रेचिंग, टोनिंग आणि बळकट करण्यात मदत करतो.

हेही वाचा – IRCTCने लेह आणि लडाख फिरण्यासाठी आणले जबरदस्त टूर पॅकेज, कमी खर्चात मित्रांसोबत काढा ट्रिप

भात खा : ऋजुताच्या मते,”पोषणतज्ञ प्रवास करताना रात्रीच्या जेवणासाठी भात खाण्याची शिफारस करतात, कारण ते भारत, मध्य पूर्व, भूमध्यसागरीय देश आणि युरोपसह सर्व प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत भात खाल्ल्याने दिवसभरातील अस्वास्थ्यकर खाण्यासह संतलुन साधण्यास मदत होऊ शकते” ऋजुता दिवेकरने यापूर्वी आपल्या दैनंदिन आहारात भाताचे महत्त्व सांगितले आहे की, 10,000 पेक्षा जास्त प्रकार उपलब्ध आहेत. भारतात, आणि हे एक शुभ धान्य मानले जाते. या मुख्य अन्नाला पर्याय नाही यावर तिने भर दिला आहे.