scorecardresearch

Chanakya Niti: शत्रूंमुळे होतंय का आर्थिक नुकसान? मग ‘या’ सवयी अंगीकारल्यानं मिळेल यश

प्रत्येक माणसाला त्यानं मिळवलेलं यश एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं, पण अनेक लोकांना समोरच्याची प्रगती पाहून हेवा वाटतो आणि ते यशस्वी माणसाचे शत्रू बनू लागतात. अशा शत्रूंमुळे काही वेळा पैशाचं नुकसानही होतं. यासाठी आचार्य चाणत्य यांनी सांगितलेल्या नीति तुमच्या उपयोगाचे ठरू शकतात.

chanakya-niti-enemys
(Photo: File Photo)

आचार्य चाणक्य यांनी अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचा अवलंब करून आपण आपलं जीवन शांततेनं जगू शकतो. प्रत्येक माणसाला त्यानं मिळवलेलं यश एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं, पण अनेक लोकांना समोरच्याची प्रगती पाहून हेवा वाटतो आणि ते यशस्वी माणसाचे शत्रू बनू लागतात. अशा शत्रूंमुळे काही वेळा पैशाचं नुकसानही होतं. आचार्य चाणक्य यांनी असे काही गुण सांगितले आहेत, जे आपल्या जीवनात समाविष्ट करून आपण आपल्या शत्रूंच्या चालींवर मात करू शकतो. नेमक्या कोणत्या आहेत त्या गोष्टी? जाणून घेऊयात सविस्तर…

पैसे कमवण्यासाठी चुकीचा मार्ग निवडू नका: चाणक्य नीतिमध्ये असं सांगितलं आहे की, पैसे कमवण्यासाठी कधीही चुकीचा मार्ग निवडू नका. यामुळे तुमच्या शत्रूंना तुम्हाला मागे खेचण्याची संधीही मिळते. यामुळे तुमची प्रतिमा डगमगण्याची शक्यता असते आणि तुम्ही प्रत्येक पायरीवर खोटं बोलू लागता. यामुळे तुमचे शत्रू आणखी बळकट होतात. म्हणून नेहमी पैसे कमवण्यासाठी योग्य मार्ग निवडा आणि नेहमी सत्याचा सामना करा.

स्वतःला नम्र बनवा : तुमचा नम्र स्वभाव तुमचे शत्रू निर्माण होऊ देत नाहीत. चाणक्य नीतिनुसार, तुमचे शत्रू सुद्धा मधुर संवादामुळे मदत करण्यास तयार होतात आणि तुमच्या विरोधात कोणतीही चाल खेळण्याचा विचार करत नाहीत. कडू बोलणाऱ्या व्यक्तींची शत्रूंची संख्याही जास्त असते. असे व्यक्ती दिवसेंदिवस वेगवेगळ्या अचडणीत अडकतात आणि त्यांचे पैसे गमावून बसतात. म्हणून, मधुर भाषेत बोलण्याचा प्रयत्न करा. तुमचे शत्रू देखील तुमच्या सोबत असतील.

ज्ञानामध्ये वाढ करा: चाणक्य नीतिनुसार, एक हूशार व्यक्ती प्रत्येकाबरोबर पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या शत्रूंवर विजय मिळवून त्यांना आपला मित्र बनवतो. त्यामुळे तुमचे ज्ञान वाढवा. यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारू शकते. इतरांना मदत तुमची मदत सुद्धा होईल आणि आपले शत्रु कमी होऊन त्यांना मित्र बनविण्यात सक्षम व्हाल.

हुशारीने खर्च करा : पैसे जमा करायला शिका आणि पैशांचा योग्य ठिकाणी योग्य वापर कसा करता येईल याचा विचार करा. यामुळे समृद्धी कायम राहील आणि शत्रू तुमच्या पैशाचं नुकसान करू शकणार नाहीत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-10-2021 at 21:54 IST

संबंधित बातम्या