Natural Way To Clean Heart Arteries: आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण आयुष्यात हृदयविकार आणि कोलेस्ट्रॉल या समस्या झपाट्याने वाढताना दिसतायत. लाखो लोक आज हृदयाशी संबंधित आजारांनी त्रस्त आहेत. रक्तामध्ये वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) वाढलं की, ते हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये थर जमा करून, ब्लॉकेज निर्माण करतं आणि हेच पुढे हार्ट अटॅकचं मुख्य कारण ठरतं.

डॉक्टर सांगतात की, कोलेस्ट्रॉल जर धमन्यांमध्ये साचलं, तर हृदयाला रक्त पंप करताना अधिक दाब द्यावा लागतो. त्यामुळे रक्तदाब वाढतो, रक्तप्रवाह विस्कळित होतो आणि हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो.

पण तुम्हाला माहीत आहे का की, आपल्या स्वयंपाकघरातच असा एक चमत्कारिक मसाला आहे, जो रोज थोड्याशा प्रमाणात खाल्लात, तर तुमच्या हृदयाला मोठा आधार मिळू शकतो. तो मसाला इतका सामान्य आहे की, रोजच्या स्वयंपाकात आपण त्याचा वापर करतो; पण त्याच्यात दडलेलं ‘औषधी गुपित’ फारच थोड्यांना ठाऊक आहे.

तज्ज्ञ काय सांगतात?

आयुर्वेद आणि युनानी वैद्यकशास्त्राचे प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. सलीम जैदी यांच्या मते, हा मसाला जर दररोज चावून खाल्ला, तर तो रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करून रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतो. इतकंच नाही, तर त्याचे घटक धमन्यांमध्ये जमा झालेला मेद (फॅट) वितळवतात, ज्यामुळे ब्लॉकेज कमी होऊन हार्ट अटॅकचा धोका टळतो.

या मसाल्यात असे घटक असतात, जे रक्ताभिसरण सुधारतात, शरीरातील विषाक्त घटक बाहेर टाकतात आणि पेशींचं नुकसान होऊ देत नाहीत. त्यामुळे हा मसाला अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इम्फ्लेमेटरी म्हणून कार्य करतो.

हृदयाचं आरोग्य टिकवण्यासाठी कसा वापराल?

तज्ज्ञ सांगतात की, या मसाल्याचा छोटासा तुकडा दररोज सकाळी चावून खा. जर तुम्हाला तो थेट खायला जड वाटत असेल, तर तो किसून आपल्या जेवणात किंवा चपातीसोबत खाऊ शकता. उन्हाळ्यातही त्याचं सेवन केल्यानं त्रास होत नाही, उलट शरीरातली उष्णता आणि पोटफुगीचा त्रास कमी होतो.

अर्धा किंवा एक चमचा किसलेला हा मसाला रोज घेतल्याने

रक्तामधील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं.

हृदय मजबूत राहतं.

पचनसंस्थाही नीट काम करते.

पण कोणता आहे हा मसाला?

आता प्रश्न पडतो की, इतके चमत्कार करणारा मसाला शेवटी आहे तरी कोणता? तुमच्या किचनमध्ये दररोज वापरला जाणारा तो साधासुधा मसाला म्हणजेच आलं.

आलं : हृदयाचा गुप्त रक्षक!

आल्यामध्ये असणारे नैसर्गिक औषधी घटक रक्त शुद्ध ठेवतात, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतात आणि हृदयाच्या पेशींना ताकद देतात. रोज फक्त आल्याचा छोटा तुकडा चावून खाल्लात, तर तुम्ही आरोग्याच्या मोठ्या धोक्यापासून स्वतःला वाचवू शकता.

आल्याचा एक छोटा तुकडा आणि तुम्ही आपल्या हृदय, रक्तवाहिन्या आणि कोलेस्ट्रॉलला पूर्णपणे नियंत्रणात ठेवू शकता!