Chia Seeds Water Benefits: चिया सीड्स एक अत्यंत फायदेशीर पदार्थ आहे, जो अनेक पोषक घटकांनी युक्त असून वजन कमी करण्यासाठी त्याचा अधिक फायदा करून घेतला जातो. तसेच त्वचा आणि केसांनाही त्याचा लाभ मिळतो. फायबर, प्रोटीन, अनसॅच्युरेडेट फॅट्स, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक मायक्रोन्यूट्रिअट्ंस चिया सीड्समध्ये आढळतात. जर तुम्ही इन्स्टाग्रामवर पाच मिनिटे स्क्रोल केले, तर तुम्हाला प्रत्येक आरोग्य विषय रीलमध्ये चिया सीड्स पाण्याचे फायदे पाहायला मिळतील. तुम्हाला माहितीये का? आठवडाभर चिया सीड्स पाणी प्यायलात, तर शरीरावर काय परिणाम होईल. चला जाणून घेऊयात.

चिया सीड्स फायबर, वनस्पती प्रथिने, ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स यांनी भरलेले असतात. पाण्यात भिजवल्यावर ते फुगून जेलीसारखे पेय बनते, जे पचन, हायड्रेशन आणि त्वचेसाठीदेखील चांगले असते. दररोज सकाळी एक ग्लास चिया सीड्सचं पाणी नाश्त्याच्या ३० मिनिटे आधी प्या.

१. पचन लक्षणीयरीत्या सुधारेल

चिया सीड्सच्या पाण्याचं सेवन केल्यानं पचनक्रिया लक्षणीयरीत्या सुधारते. २०१९ मध्ये न्यूट्रिएंट्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, चिया सीड्समध्ये विरघळणारे फायबर भरपूर प्रमाणात असते, जे आतड्यांच्या हालचाली नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे पोटफुगी कमी होते आणि सकाळी हलके वाटते. रिकाम्या पोटी चिया सीड्सचे पाणी प्यायल्याने पचनसंस्था हळुवारपणे जागृत होते. पोटात पेटके येत नाहीत, अस्वस्थता जाणवत नाही.

२. नाश्ता न करताही पोट भरल्यासारखे वाटते

नाश्ता न करताही बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. २०२० च्या एका संशोधन पत्रानुसार, फायबर भुकेच्या संप्रेरकांचे नियमन करण्यास मदत करते आणि जळजळ कमी करते. चिया सीड्स पोटात जागा व्यापतात, ज्यामुळे भूक नियंत्रणास मदत होते आणि अनावश्यक खाण्यापासून आपल्याला रोखते.

३. दिवसभर फ्रेश

सहसा, दुपारच्या जेवणानंतर झोप येते आळस येतो. मात्र, चिया सीड्सच्या पाण्याचं सेवन केल्यानं दिवसभर फ्रेश वाटतं. फूड हायड्रोकोलॉइड्स फॉर हेल्थमधील एका पुनरावलोकनात असे स्पष्ट केले गेले आहे की, चिया सीड्समध्ये हळूहळू पचणारे कार्बोहायड्रेट्स आणि वनस्पती-आधारित प्रथिने असतात, जी हळूहळू ऊर्जा सोडतात.

४. त्वचा अधिक हायड्रेटेड होते

चिया सीड्समध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा-३ फॅट्स जास्त असतात, जे त्वचेच्या आरोग्याला आधार देतात. एका आठवड्यात चेहऱ्यावरचा कोरडेपणा कमी होतो.

५. गोड खाणं कमी होतं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा कदाचित सर्वांत आश्चर्यकारक बदल होतो. संध्याकाळी ५ वाजता गोड काहीतरी हवे असते, बिस्किट, मफिन, कधी कधी दोन्ही. पण दुपारी चिया सीड्सचे पाणी प्यायल्यानंतर अजिबात भूक लागत नाही. अमेरिकेच्या सीडीसीनुसार, फायबर रक्तप्रवाहात साखरेचे शोषण कमी करते. त्यामुळे तुम्हाला साखरेची तीव्र इच्छा निर्माण होत नाही. त्यामुळे आठवडाभर चिया सीड्सचे पाणी पिणे खरोखर प्रभावी आहे.