गेले दोन वर्ष करोना महामारीमुळे सर्वच गोष्टींवर बंधने आली. यातीलच एक गोष्ट म्हणजे मुलांच्या शाळा. जवळपास दीड वर्ष मुले शाळेत गेली नाहीत. आता शाळा सुरु झाल्या असल्या तरीही पालक अजूनही मुलांना शाळेत पाठवण्यासाठी घाबरत आहेत. मुलांच्या शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरु आहेत. मुलांचे शिक्षण थांबले नसले तरीही करोनामुळे मुलांचे नुकसान होत आहे यात काही दुमत नाही. गेल्या दोन वर्षात शाळा बंद असल्याने मुलांची लिहण्याची सवय सुटली आहे. आता खूप वेळ लिहायला गेलं की मुलांचा हात दुखू लागतो. तसेच त्यांचा लिहण्याचा वेग कमी झाला असल्याचे तुमच्याही निदर्शनात आले असेलच.

नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT)ने अखिल भारतीय शालेय शिक्षणावर आधारित सर्वेक्षण केले. यामध्ये मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान जवळपास १० हजार शासकीय आणि खाजगी शाळांच्या मुलांचा समावेश होता. सहभागी झालेली ही मुले इयत्ता चौथी ते दहावी या वर्गातील होती. या सर्वेक्षणात असे आढळले की ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांचे हस्ताक्षर खराब झाले आहे. याचे कारण म्हणजे या मुलांनी वह्यांमध्ये लिहिण्यापेक्षा मोबाईल-कंप्यूटरवरून शिक्षकांच्या शिकवणीकडे अधिक लक्ष दिले. दोन-तीन ओळी लिहल्यानंतर मुले पुढे लिहू शकत नाही आहेत. याशिवाय मुलांच्या विचार करण्याच्या क्षमतेवरही ऑनलाइन शिक्षणाचा वाईट प्रभाव पडला आहे.

वर्कआउट करण्यापूर्वी आणि नंतर कसे आणि किती प्रमाणात पाणी प्यावे; जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न लिहिण्याचे तोटे

  • मुलांना वर्गात लक्ष देता येत नाही.
  • मुलांना स्मार्टफोन घेऊन अभ्यास करण्याची सवय झाली आहे.
  • लेखन बिघडले आहे.
  • व्याकरणाच्या चुका अधिक होत आहेत.
  • पेन/पेन्सिलने लिहिण्याचा वेग कमी झाला आहे.
  • लिहिताना हात दुखायला लागतात.
  • लेखन कुठून सुरू करायचे याचा विचार करण्याची क्षमता कमी झाली आहे.

लिखाणासंबंधी मुलांसमोर येणाऱ्या समस्या

  • कोणतेही अक्षर छोटे किंवा मोठे लिहणे.
  • एका ओळीत लिहिण्याऐवजी वर-खाली लिहणे.
  • दोन शब्दांमध्ये अधिक अंतर ठेवणे.
  • चुकीच्या दिशेत लिहणे.
  • चूक झाल्यास अक्षरे चुकीच्या पद्धतीने खोडणे.
  • एकावर एक लिहणे म्हणजेच ओव्हर रायटिंग करणे.

पाणीपुरी खाऊन कमी करता येणार वजन? समोर आली आश्चर्यकारक माहिती

हस्तलेखन सुधारण्याचे मार्ग

  • जर मूल पेन आणि पेन्सिल धरू शकत नसेल तर त्याच्या हाताची पकड तपासा. जर मुलाने अंगठा, मधले बोट आणि तर्जनी यांनी पेन किंवा पेन्सिल धरले असेल तर ते ठीक आहे.
  • पेन्सिल किंवा पेन खूप घट्ट धरल्याने हात थकतो आणि लिखाण खराब होऊ लागते.
  • गृहपाठ लवकर पूर्ण करायला सांगून त्यांच्यावर दबाव आणू नका. या प्रकरणात मुलं आपलं लिखाण बिघडवतात. त्यांना खेळकर पद्धतीने गृहपाठ करायला लावा.
  • मुलांना प्रथम कोणत्याही शब्दाचे प्रत्येक अक्षर लिहायला शिकवा आणि नंतर संपूर्ण शब्द एकत्र लिहायला सांगा. यासाठी काही वेळ लागू शकतो. या दरम्यान, मुलाला दोन अक्षरे आणि दोन शब्दांमध्ये किती जागा सोडली पाहिजे ते समजावा.

शिक्षक आणि पालकांनी मुलांना लिहण्यासाठी असे प्रोत्साहन द्यावे

  • तुम्ही मुलांना, त्यांच्या एखाद्या मित्र-मैत्रिणीसाठी पत्र लिहायला सांगू शकता.
  • मुलांना कविता लिहायला सांगा आणि उत्कृष्ट लेखकाला बक्षीस द्या.
  • मुलांना वेगवेगळ्या प्रकारची कार्ड बनवायला आणि त्यावर चांगल्या गोष्टी लिहायला सांगा.
  • एखादे चित्र काढायला सांगून त्यासाठी शीर्षक द्यायला सांगा.