आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात मुलं जास्तीत जास्त वेळ घरातच बसून घालवतात. बहुतेक मुलं टीव्ही, स्मार्टफोन्स आणि इतर गॅजेट्सना चिकटून असतात. ते क्वचितच शरीराला व्यायाम देतात किंवा बाहेर जाऊन खेळतात.

८ ते १२ वर्ष वयोगटातील मुलं दररोज ऑन-स्क्रीन मीडियावर किमान ४ तास ४४ मिनिटं घालवतात, तर किशोरवयीन मुलांमध्ये हेच प्रमाण सरासरी ७ तास २२ मिनिटे आहे. लहान मुलांच्या तंत्रज्ञानविषयक सवयींचा मागोवा घेणाऱ्या ‘कॉमन सेन्स मीडिया’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. यात शाळेसाठी किंवा गृहपाठ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्क्रीन मीडियाचा समावेश केलेला नाही. व्हिडिओ पाहात – बहुतेक वेळेस यु- ट्यूबवर घालवला जाणारा वेळ अंदाजे दुप्पट म्हणजे दिवसाला एक तास इतका झाला आहे.
पालकांसाठी ही चिंतेची बाब झाली आहे. मुलांनी तंत्रज्ञान आत्मसात करणं महत्त्वाचं वाटत असल्याचं सांगितलं ‘नॅशनल ट्रस्ट सर्व्हे’ दरम्यान प्रश्नांची उत्तरे देताना पालकांनी सांगितल. तर, दहापैकी नऊ पालकांना आपल्या मुलांनी बाहेरच्या जगात, निसर्गाशी नाते जोडत आपले बालपण घालवावे असे वाटत असल्याचे सांगितले. याची दखल घेत ‘फेव्हिक्रिएट’मधील तज्ज्ञांनी बालदिनानिमित्त मुलांच्या डिजिटल डिटॉक्ससाठी काही मार्ग सुचवले आहेत.

बाहेर मैदानावर जाऊन खेळा

मुलांना सगळ्यात जास्त आवडतं, ते बागेत खेळणं. झोक्यापासून घसरगुंडीपर्यंत मुलांना सगळं काही तिथे खेळता येतं. फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेटसारखे खेळ आणि दोरीच्या उडया, सायकलिंगसारख्या इतर गोष्टी… ही यादी न संपणारी आहे. मोकळ्या हवेत खेळण्यामुळे शारीरिक विकास होतो, शिवाय तो मुलांची शैक्षणिक क्षमता विकसित करण्याचा अभिनव मार्ग आहे. बाहेर खेळल्याने मुलांचे संवादकौशल्य सुधारते, कारण त्यांना आपणहून आपल्या कोशातून बाहेर येऊन इतर मुलांशी संवाद साधावा लागते. त्याशिवाय विकासाच्या टप्प्यावर असताना मैदानी खेळ मुलांना मोटर सेन्स, हात व डोळ्यांचा समन्वय आणि एकंदर कामगिरी उंचावण्यास मदत करतात. तेव्हा तुमच्या मुलांना मोकळ्या हवेत खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या व त्यांना काही मजेदार खेळ खेळू द्या.

घड्याळाचे काटे थांबवा आणि वाचन करा

आई-बाबाही कधी काळी लहान होते आणि ते पांडव, बिरबलाचं चातुर्य, विक्रम-वेताळच्या गोष्टी वाचत मोठे झाले. या गोष्टींनी त्यांना काही महत्त्वाचे धडे शिकवले. मुलांना गुंतवून ठेवणाऱ्या गोष्टी सांगताना त्यांच्याबरोबरचं नातं घट्ट करणं, शिवाय गोष्टींतून आयुष्यातले महत्त्वाचे धडे देणं अशी दोन्ही कामं पालकांना करता येतील.

संगीत, नृत्य, नाट्य इत्यादी

मुलांना गायन, नृत्यासारखे छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन द्या, कारण त्यातून मुलांचा भावनिक विकास होतो. यातून त्यांचा आत्मविश्वास वाढतो, मंचावर सादरीकरण करताना मुलांना वाटणारा न्युनगंड कमी होतो. मुलांचे कलागुण समोर आणण्यास, त्यांची सर्जनशीलता आणि कल्पनाशक्तीसा चालना देण्यास मदत करतात.

सहलीला जा

मुलांना ट्रेकिंग, हायकिंग, कॅम्पिंगसाठी घेऊन जा. त्यांच्या मनावर सकारात्मक परिणाम करतील असे नवीन खेळ आणि उपक्रमांचा त्यांना भाग होऊ द्या.

कलाकुसरीत सहभाग

मुलांना कलाकुसरीमध्ये गुंतवा. त्यांना आपली सर्जनशीलता उंचावण्यासाठी चौकटीबाहेरचा विचार करण्यासाठी चालन द्या. हस्तकलेत गुंतल्याने मुलांच्या मेंदूला चालना मिळते आणि त्यांची एकाग्रता वाढते. कलेमुळे मुलांना वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये आत्मसात करता येतात, शिवाय शिकण्याप्रती व्यवहार्य दृष्टीकोन विकसित करण्यात मदत होते. कल्पक आणि सर्जनशील निर्मितीचे मुलांना समाधान वाटते. मुलांना ‘डु-इट-युअरसेल्फ’मधून मूलभूत कौशल्ये विकसित करता येतात, शिवाय त्यांचा आत्मविश्वास वाढतो.

या बालदिनी मुलांना त्यांच्यात दडलेल्या सुप्त कलागुणांना वाव द्या आणि आकर्षक वस्तू तयार करत मजेत शिक्षण घेऊ द्या. त्यांना रिसायकल केलेल्या साहित्यापासून रोबोट बनवता येईल, स्लाइम बनवता येईल. fevicreate.com वर देण्यात आलेल्या वेगवेगळ्या संकल्पना वापरून फ्रीज मॅग्नेट बनवता येईल. तुम्हाला फेव्हिक्रिएट ‘डीआयवाय’ किटसुद्धा खरेदी करता येईल.