Bad Breath: आजकाल बहुतेक लोक तोंडाच्या दुर्गंधीच्या समस्येने त्रस्त आहेत. या समस्येचा त्यांच्या सामाजिक जीवनावरही परिणाम होतो. खरं तर सकाळी झोपेतून उठल्यानंतर तोंडाची दुर्गंधी येणे सामान्य आहे; परंतु जर ही समस्या नेहमीच उद्भवत असेल, तर कधी कधी चारचौघांत अवघडल्यासारखे होते. जर तुम्हालाही तोंडाच्या दुर्गंधींना त्रास होत असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, जे तुम्ही अमलात आणू शकता. त्यामुळे तोंडानी दुर्गंधी तर दूर होईलच; पण तुम्हाला पूर्णपणे ताजेतवाने वाटेल.
तोंडाच्या दुर्गंधीवर लवंग प्रभावी
लवंगमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे तोंडात असलेले हानिकारक बॅक्टेरिया सहजपणे नष्ट करतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी लवंग चावल्याने तोंडाच्या दुर्गंधीपासून आराम मिळतो. त्याशिवाय लवंगाचे तेल दातासाठीही फायदेशीर आहे.
दुर्गंधीवर तुळसही रामबाण
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांचा वापर करू शकता. तुळशीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल घटक असतात, जे तोंडाचे आरोग्य सुधारतात. ज्याच्या सेवनामुळे पचनशक्ती सुधारते. तुम्ही सकाळी उपाशीपोटी चार ते पाच तुळशीची पाने खाऊ शकता. त्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होईल.