आता हिवाळा ऋतूचे चार महिने सुरू झाले आहेत. जसजसे हवामान बदलते त्याप्रमाणे प्रदूषण देखील वाढते. हिवाळ्यात धुक्याचे प्रमाण वाढते त्यामुळे प्रदूषणात आणखी भर पडते. अशात श्वसनाचा त्रास असणाऱ्यांची समस्या आणखी वाढू शकते. दम्याचा त्रास असणाऱ्यांना तर या दिवसांमध्ये घराबाहेर पडणे कठीण होते. श्वसनाचा त्रास नसऱ्यांना देखील या वातावरणामध्ये हा त्रास होऊ शकतो, त्यामुळे सर्वांनीच या दिवसांमध्ये तब्येतीची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. अशावेळी थंडीच्या दिवसांमध्ये लवंग खाण्याचा सल्ला दिला जातो. लवंग या समस्येवर फायदेशीर ठरते का जाणून घ्या.

लवंगमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट व्हिटॅमिन असतात. ज्यामुळे अनेक आजारांपासून लांब राहण्यास मदत मिळते. घसा खवखवणे, दातांचे दुखणे यासाठी तसेच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी लवंग मदत करते. पचनक्रिया नीट राहण्यास आणि ऍसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी लवंग फायदेशीर ठरू शकते.

श्वसनाचा त्रास असणाऱ्यांना लवंग अशाप्रकारे फायदेशीर ठरू शकते
लवंगमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे श्वसनासंबंधित समस्या कमी होऊ शकतात.
लवंग श्वसन प्रक्रिया सक्रिय करण्यास मदत करते, जे दमा असणाऱ्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकते.
तुम्ही चहमध्ये लवंग टाकून त्याचे सेवन करू शकता किंवा तोंडात काही वेळ लवंग ठेऊ शकता. दम्याचा त्रास असणाऱ्यांनी गरम पाण्यामध्ये लवंग टेल टाकून त्याची वाफ घेतल्यास फायदेशीर ठरू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)