Coconut Water Or Sugarcane Juice Which Drink Is Better For Summer : उन्हाळ्यात आपल्याला सतत काही ना काही थंड पिण्याची इच्छा होत असते. तसेच प्रत्येकाला अशा गोष्टींचे सेवन करायचे असते शरीराला थंड आणि हायड्रेट राहण्यास मदत करतील. तर थंड आणि हायड्रेट हे दोन्ही शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर येतं ते फक्त नारळाचे पाणी आणि उसाचा रस बरोबर ना… त्याचबरोबर उन्हाळ्यात लोकांची पहिली पसंती उसाचा रस आहे. पण, नारळ पाणी आणि उसाचा रस दोन्हीचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?

तर उन्हाळ्यात नारळ पाणी की उसाचा रस पिणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे का चला जाणून घेऊया…

उसाचा रस पिण्याचे फायदे –

उसाचा रस पूर्णपणे नैसर्गिक आहे, जो शरीराला लगेच ऊर्जा देतो. त्याचे सेवन केल्याने शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत आणि यकृत निरोगी राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात, उसाचा रस शरीराला थंडावा देतो आणि उष्माघाताची शक्यताही कमी होते. उसाच्या रसामध्ये आढळणारे घटक त्वचा चमकदार आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.

नारळ पाणी पिण्याचे फायदे –

उन्हाळ्यात नारळ पाणी पिल्याने आपल्या शरीरात हायड्रेशनची कमतरता भासत नाही. यामुळे पचन सुधारण्यास, आम्लता कमी होण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी पिल्याने वजन नियंत्रित राहण्यास देखील मदत होते. कारण – त्यात कॅलरीज कमी असतात. याबरोबर, रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करतात.

तर मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, उन्हाळ्यासाठी नारळ पाणी की उसाचा रस बेस्ट आहे?

तर या दोन्हींचे स्वतःचे फायदे आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार ते सेवन करू शकता. जर तुम्हाला त्वरित उर्जेची आवश्यकता असेल तर तुम्ही उसाचा रस पिऊ शकता. पण, जर तुम्हाला तुमचे शरीर हायड्रेट करायचे असेल तर तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता. मधुमेह असलेल्या लोकांनी नारळ पाणी प्यायल्यास त्यांची साखर नियंत्रणात राहील आणि त्यांना उष्णतेपासूनही आराम मिळेल कारण उसाच्या रसात भरपूर साखर असते.