अनेकदा लोक हिवाळ्यात केस गरम पाण्याने आणि उन्हाळ्यात थंड पाण्याने धुतात. परंतु केस गळणे, तुटणे आणि कोंडा यासारख्या समस्या सर्वच ऋतूंमध्ये कायम राहतात. अशा परिस्थितीत, केसांसाठी काय चांगले आहे जेणेकरून ते मजबूत आणि चमकदार राहतील? सर्व उत्पादनांचा वापर करूनही ही समस्या कायम आहे, म्हणूनच आता आपल्या केसांसाठी योग्य पाण्याबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे.कोणत्या प्रकारच्या पाण्याचा तुमच्या केसांवर कसा परिणाम होतो ते जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

( हे ही वाचा: ‘या’ ४ राशींमध्ये दडलेले आहेत श्रीमंत होण्याचे सर्व गुण, जाणून घ्या तुमच्या राशीचाही त्यात समावेश आहे का? )

गरम पाण्याने केस धुताना

१. गरम पाण्याने केस धुतल्याने टाळूच्या कोंडामुळे बंद झालेली छिद्रे उघडतात. खुल्या छिद्रांमुळे, तेल लावताना तुमच्या केसांमधील तेलाचे सर्व गुणधर्म टाळूवर जातात, ज्यामुळे ते मजबूत आणि वाढतात. याशिवाय कोमट पाणी डोक्यावरील घाण चांगल्या प्रकारे काढून टाकली जाते.

२. तर दुसरीकडे गरम पाण्यामुळे केस कोरडे आणि फ्रिज़ी होतात. कारण यामुळे तुमच्या टाळूचे नैसर्गिक तेल आणि आर्द्रता कमी होते, ज्यामुळे केस कोरडे वाटू लागतात.

( हे ही वाचा: India Post Recruitment 2021: भारतीय पोस्टमध्ये १२वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; पगार ८१ हजारापर्यंत! )

थंड पाण्याने केस धुताना

१. थंड पाणी केसांचे नैसर्गिक तेल वेगळे होऊ देत नाही, ज्यामुळे स्कॅल्प हायड्रेटेड राहते. याशिवाय, थंड पाण्याने छिद्र देखील बंद केले जातात, ज्यामुळे बाहेरून घाण आणि ऍक्सेस ऑइल टाळूच्या आत जात नाही. कारण उघड्या छिद्रांमध्ये केसांच्या मुळांमध्ये प्रदूषण, धूळ आणि बाहेरून माती येण्याचा धोका जास्त असतो.

२. थंड पाणी केसांपासून त्यांची मात्रा देखील काढून घेते. कारण यामुळे ऍक्सेस ऑइल टाळूवर राहते, त्यामुळे तेलाच्या ओझ्यामुळे केस डोक्यावर अडकतात.

( हे ही वाचा: लहान मुलगी खेळतेय अवाढव्य सापाशी; हा Viral Video एकदा बघाच! )

नक्की केस कसे धुवायचे ?

स्टेप १ – गरम पाण्याने केस धुण्यास सुरुवात करा. शॅम्पूने टाळूला नीट मसाज करा आणि टाळूवरील घाण आणि तेल काढून टाका.

स्टेप २ – गरम पाण्याने केसांमधून शॅम्पू काढा आणि नंतर कंडिशनर लावा.

स्टेप ३ – पाच मिनिटांनंतर, कंडिशनर थंड पाण्याने धुवत काढून टाका.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cold or hot what kind of water should be used to wash hair ttg
First published on: 12-12-2021 at 15:57 IST